लातूरमधील एका शिक्षकाने ग्रुपवर स्वतःचा फोटो टाकून दिली भावपूर्ण श्रध्दांजली


नातेवाईक शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा तोडून आत गेले.त्यांनी पाहिलं तर सचिन शिवराज अंबुलगे यांनी साडीच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. On the group by a teacher from Latur A heartfelt tribute to his own photo


विशेष प्रतिनिधी

लातूर : जिल्हा परीषद शाळेतील एका सहशिक्षकाने व्हाॅट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो टाकून भावपूर्ण श्रध्दांजली अशी पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची घटना काल जिल्ह्यातील चाकूर येथे घडली आहे.चाकूर येथील जिल्हा परीषद मुलांच्या शाळेत सचिन शिवराज अंबुलगे (40) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते.दरम्यान शहरातील आदर्श काॅलनीतील एका भाड्याच्या खोलीमध्ये ते कुटुंबीयासह राहत होते.सचिन शिवराज अंबुलगे यांची पत्नी व मुलगा गावाकडे गेले होते. दरम्यान रात्री अंबुलगे यांनी शाळेतील शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो टाकून भावपुर्ण श्रध्दांजली असे लिहले.तसेच त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत नातेवाईकांनाही सांगितले होते. दरम्यान नातेवाईक
शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा तोडून आत गेले.त्यांनी पाहिलं तर सचिन शिवराज अंबुलगे यांनी साडीच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शिवाजी गुंडरे, बालाजी नाईक यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.अंबुलगे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तसेच अंबुलगे यांच्या पत्नीने खाजगी सावकार पतीला त्रास देत असल्याची तक्रार काही दिवसापुर्वी पोलीसांत दिली होती.याबाबत भाऊ रविंद्र अंबुलगे यांच्या तक्रारीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

On the group by a teacher from Latur A heartfelt tribute to his own photo

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती