अरुणाचल प्रदेशातील हरवलेला मुलगा चिनी सैन्याला सापडला; भारताकडे सुपूर्त करणार


वृत्तसंस्था

तेजपुर : अरुणाचल प्रदेशात हरवलेल्या 17 वर्षांचा मीराम तोरम हा मुलगा चिनी सैन्याला सापडला आहे. लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असे भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. Chinese army finds missing boy in Arunachal Pradesh; Will be handed over to India

6 दिवसांपूर्वी मीराम तोरम हा मुलगा हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने चिनी सैन्यदलाची संपर्क साधून त्याला शोधण्याची सूचना केली होती. त्यानुसार चिनी सैन्यदलाने त्या मुलाला शोधले असून लवकरच तो भारताच्या सुपूर्द करण्यात येईल, असे भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. अरुणाचल प्रदेश मधील खासदारांनी यासंदर्भात लोकसभेच्या सभापतींकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.



भारतीय लष्कराने देखील वेगवान हालचाली करून संबंधित मुलाला शोधण्यासाठी मोहीम राबवली होती. आता चिनी सैन्य दलाला मीराम तारोम हा मुलगा सापडला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

चिनी सैन्य दलाने या मुलाचे अपहरण केल्याचा आरोपही करण्यात आला होता परंतु आता अधिकृतरित्या भारतीय लष्कराने हा मुलगा सापडला आहे तो भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

Chinese army finds missing boy in Arunachal Pradesh; Will be handed over to India

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात