Punjab Cabinet Expansion : रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता चन्नी मंत्रिमंडळाचा विस्तार, सात नवीन चेहऱ्यांचा समावेश

Punjab Cabinet Expansion Tommorrow Sundey At 4 30 PM, these 7 new MLA Will Be In Cabinet

Punjab Cabinet Expansion : पंजाबमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता होईल. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन शपथविधीची वेळ मागितली. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहऱ्यांना स्थान दिले जाऊ शकते. यासोबतच अमरिंदर सिंग सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Punjab Cabinet Expansion Tommorrow Sundey At 4 30 PM, these 7 new MLA Will Be In Cabinet


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : पंजाबमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता होईल. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन शपथविधीची वेळ मागितली. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहऱ्यांना स्थान दिले जाऊ शकते. यासोबतच अमरिंदर सिंग सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते

ज्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते त्यामध्ये परगट सिंग, राज कुमार वेरका, गुरकीरत सिंग कोटली, संगत सिंग गिलजियन, कुलजीत सिंह नगर, राणा गुरजीत सिंग आणि अमरिंदर सिंग राजा वारिंग यांची नावे आहेत.

जुन्या कॅप्टन सरकारमधील कोण टिकणार?

ज्यांना आणखी एक संधी मिळू शकते, त्यांच्यात सुखजिंदर रंधावा (उपमुख्यमंत्री), ओपी सोनी (उपमुख्यमंत्री), मनप्रीत सिंग बादल, ब्रह्म मोहिंद्रा, त्रिपाट राजिंदर सिंह बाजवा, रझिया सुल्ताना, सुखबिंदर सिंग सरकारिया, भारत भूषण आशु, अरुणा चौधरी आणि विजय इंदर सिंगला यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधी यांच्या घरी उच्चस्तरीय बैठक

पंजाबमधील मंत्रिमंडळाबाबत गुरुवारी राहुल गांधी यांच्या घरी रात्री 10 ते 2 पर्यंत मंथन झाले. या उच्चस्तरीय बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी, पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत, केसी वेणुगोपाल आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी उपस्थित होते.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या वक्तव्यावर हायकमांडचे मौन

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांना मंत्रिमंडळ रचनेवर चर्चा करण्यासाठी दिल्लीला खास बोलावले होते. ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षनेतृत्वावर आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली. अमरिंदर सिंग यांना उत्तर देणे महागात पडू शकते हे पक्षश्रेष्ठींना माहिती आहे. म्हणूनच कॅप्टनने राहुल-प्रियांका यांना अननुभवी म्हणूनही पक्षाने अतिशय मवाळ प्रतिक्रिया दिली आहे.

Punjab Cabinet Expansion Tommorrow Sundey At 4 30 PM, these 7 new MLA Will Be In Cabinet

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात