पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत पैशासह ड्रग्ज, दारूचा धूर, पाच राज्यांत हजार कोटीची रोकड पकडली, पाचशे कोटी पंजाबचाच वाटा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्य निवडणुकीत दारू आणि ड्रग्जच्या यथेच्छ वापरासह पैशाचा अक्षरश: धूर निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच राज्यांत मिळून निवडणूक आयोगाने हजार कोटी रुपयांची रोकड जप्त केली. त्यातील पाचशे कोटींची रक्कम एकट्या पंजाबमधील आहे.Punjab Assembly polls: Drugs along with money, liquor , Rs 1000 crore cash seized in five states, Punjab’s share of Rs 500 crore

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आतापर्यंत एक हजार कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जप्त केलेली रक्कम चौपट आहे.



गोव्यात १२.७३ कोटी रुपये जप्त करण्यात आले. उत्तराखंडमध्ये 18.81 कोटी रुपये पोलीसांच्या छाप्यात सापडले.उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका अद्यापही सुरू आहेत. याठिकाणी 307.92 कोटी रुपये निवडणूक प्रचाराच्या काळात पोलीसांनी जप्त केले. मात्र, उत्तर प्रदेशच्या तुलनेत अत्यंत कमी मतदारसंख्या असलेल्या पंजाबमध्ये सर्वाधिक 510 कोटी रुपयांची रोकड पोलीसांनी जप्त केली.

निवडणूक आयोगाने खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर पोलीसांनाही पैशाचा गैरवापर रोखण्याचे अधिकार आहेत. पाच राज्यांत तब्बल 228 खर्च निरीक्षक तैनात केले आहेत. त्यांनी 63 संवेदनशील विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते.

पंजाबमध्ये केवळ रोकडच नव्हे तर 76 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. पंजाब ड्रग्ज वापराबाबत बदनाम असून गेल्या अनेक वर्षांपासून उडता पंजाब म्हणून उल्लेख होतो. उत्तर प्रदेशात ५४ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली.

Punjab Assembly polls: Drugs along with money, liquor , Rs 1000 crore cash seized in five states, Punjab’s share of Rs 500 crore

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात