आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयन योगी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (NSE) माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आनंद सुब्रमण्यम हेच हिमालयन योगी असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) सूत्रांनी शुक्रवारी दिली. सीबीआयने गुरुवारी रात्री उशिरा आनंद सुब्रमण्यम यांना चेन्नईतून अटक केली होती. Anand Subramaniam is the Himalayan Yogi

आनंद सुब्रमण्यम यांच्यावर एनएसईच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. यासोबतच ते एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना सल्ला द्यायचे. चित्रा त्यांच्या इशाऱ्यावर काम करायची. चित्रा यांनी त्याच्यासोबत संवेदनशील माहितीही शेअर केली होती.

एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आनंद सुब्रमण्यम यांची सतत चौकशी करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद सुब्रमण्यम यांच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. सीबीआयने त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानावरही छापे टाकल्याचे अहवालात म्हटले आहे.

आनंद सुब्रमण्यम हे NSE प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना दिग्दर्शित करणारे हिमालयन योगी असण्याची शक्यता होती. चित्रा रामकृष्ण यांच्यावर बाजार आणि नियामकाची महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर केल्याचा आरोप आहे.

या तिसऱ्या व्यक्तीबद्दल चित्रा पूर्वी म्हणाल्या होत्या की तो हिमालयात राहणारा बाबा आहे. मला त्या हिमालयीन योगीकडून प्रेरणा मिळते. चित्रा रामकृष्ण यांनी आनंद सुब्रमण्यम यांना सतत प्रोत्साहन दिले होते. आनंद यांची केबिनही चित्राच्या केबिनला लागूनच बांधली होती.

चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील एका अज्ञात योगीला गोपनीय माहिती पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. चित्रा रामकृष्ण यांनी एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) नेतृत्व केले होते. त्या एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योग्याला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. या प्रकरणी सेबीने चित्रा रामकृष्ण यांना 3 कोटी रुपयांचा तर आनंद सुब्रमण्यम यांना 2 कोटींचा दंड ठोठावला आहे.

Anand Subramaniam is the Himalayan Yogi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात