Shivsena – BJP alliance : शिवसेना-भाजप युती होणार का??; उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसैनिकांना लढण्यासाठी वाट मोकळी केली पाहिजे!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना – भाजप यांच्यात पुन्हा युती होणार का??, हा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला आणि त्यांनी उत्तर दिले, “पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्यातल्या शिवसैनिकांवर काही वेळा अन्याय झाला त्यांना लढण्याची संधी मिळाली नाही. आता त्यांना लढण्यासाठी वाट मोकळी करून दिली पाहिजे.”Shivsena – BJP alliance :

उद्धव ठाकरे यांच्या उत्तरानंतर शिवसेना – भाजप यांच्यात युती होणार नाही, हे स्पष्ट झाले असले तरी महाविकास आघाडी देखील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकच पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार नाहीत हे देखील स्पष्ट झाले आहे.


BJP-SHIVSENA Together:औरंगाबाद-दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रावसाहेब दानवेंना भावी सहकारी म्हणाले अन्….भाजप-शिवसेना पुन्हा येणार एकत्र ?


लोकसत्ताच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यात आला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली ही काही मते अशी :

  •  स्ववबळावर सत्ता आणणं प्रत्येक पक्षप्रमुखाचं स्वप्न असलंच पाहिजे. नसेल तर तो नालायक आहे त्या पदासाठी. पण आत्ताच्या परिस्थितीत महाराष्ट्रात कुणालाही स्वबळावर सत्ता मिळेल अशी परिस्थिती नाही. मग किमान समान कार्यक्रम घेऊन पुढे चला. स्वबळ फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर प्रत्येक गावात माझ्या पक्षाची शाखा असली पाहिजे. प्रत्येक वस्तीत शिवसेना असली पाहिजे. शिवसेनेशिवाय राजकारण पुढे सरकता कामा नये, एवढी ताकद असलीच पाहिजे.
  •  तुम्हाला केंद्रात संधी मिळाली आहे, राज्यात आम्ही मिळवली आहे म्हणा. पण त्यानंतर आम्ही जनतेची कामं थांबवली आहेत का? राज्यातल्या करोना काळातल्या कामांचं सर्वोच्च न्यायालयानं देखील कौतुक केलं आहे. त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप केले. काढा बाहेर मग. शोधा काय शोधायचं
  •  संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची, हे ज्याचं त्यानं बघायचं असतं. ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्या संधीची माती करायची असेल, तर तुम्ही कपाळकरंटे आहात.
  •  बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर या केंद्रीय यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. आपली तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजा वृंदावनची संस्कृती रुजलीये, गांजाची शेती होतेय असं चित्र उभं करायचं. महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे. तुम्ही महाराष्ट्राचा आधार म्हणून उपयोग का करत नाही. महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललंय. धाडीमागू धाडी सुरू आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात. ते लवकर बदलतील यासाठी प्रयत्न करू नका.
  •  शिवसैनिक मुळात गरम रक्ताचा आहे. त्यामुळे जाऊ, तिथे वॉर्मिंग होतंच. शिवसेना ग्लोबल नाही, तर नॅशनल वॉर्मिंग तरी करतच आहे.
  •  आवाज तोच आहे. त्यातला खणखणीत पणा तोच आहे. पण पिढीप्रमाणे थोडा बदल व्हायला हवा. मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, ते कधीच सोडणार नाही. जनतेची सेवा करणारी आमची सहावी पिढी आहे. त्याच्या आधीही आमचे पूर्वच धोडपच्या किल्ल्याचे किल्लेदार होते असं म्हणतात. माझ्यावर टीका झाली की याला बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही. मला नाहीच येत. मी भाषण करतो असं मला वाटत नाही. मला भाषण करताच येत नाही हे तुम्ही लोकांनीच ठरवून टाकलं हे बरंच झालं. बाळासाहेबांचा काळ दगडाची मूर्ती तयार करण्याचा होता. आता मूर्ती बनल्यानंतर त्या शिल्पकाराचा पोरगा त्या शिल्पावर घण घालत बसला, तर ती मूर्ती तुटेल. मूर्ती झाल्यानंतर तिच्यावर फुलं वाहायला हवीत.
  •  आता परिस्थिती अशी आहे, की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आता लक्षात आलं आहे की ज्या हेतूने आम्ही युती केली होती, तो हेतू बाजूला पडला आहे. फक्त वाट्टेल त्या पद्धतीने सत्ता मिळाली पाहिजे यासाठी हिंदुत्वाचा देखील पावर होत आहे. काही शिवसैनिकांवर आमच्याकडूनही अन्याय झाला की त्यांना निवडणुका लढवायला देता आल्या नाहीत. तरी देखील ते शिवसेनेसोबत आहेत. आता राज्यातल्या शिवसैनिकांना लढण्यासाठी मोकळी वाट करून द्यायला पाहिजे. बघू.
  •  सत्ताप्राप्ती हे स्वप्नच नव्हतं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. पण लक्षात आलं की त्यासाठी राजकारणात यावं लागेल. युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही देश सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. आता देशही तुम्ही जिंकलात, राज्यही तुम्ही जिंकलात, महापालिकाही तुम्हालाच पाहिजे, मग आम्ही धुणीभांडी करायची का? धुणीभांडी करायला बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नव्हती. धुणीभांडी करणाऱ्या मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहाता यावं, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली.
  •  ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीये का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला.
  •  कुणी कुणाला बांधील नसतं. आपण कुणासोबत आघाडीत असलो, आणि तो पक्ष चुकत असला, तर जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असेल, ते मला करणं भाग आहे.
  •  तेलंगणाचे मुख्यमंत्री आले होते. यात भाजपा नको, यापेक्षा आम्हाला देश कसा हवाय, देशात कोणत्या पद्धतीने राजकारण चालायला हवं, देशाच्या राजकारणाला चांगली दिशा मिळायला हवी. गेल्या ७५ वर्षात काहीच झालं नाही हे सांगितलं जात आहे. पण सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गेल्या ७५ वर्षांत आपल्याकडून काय चुकलं, काय व्हायला हवं होतं यावर देश पातळीवर चर्चा व्हायला हवी.
  •  सत्ता कुणाला नको असते? रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू झालं आहे. ज्याप्रमाणे ही आक्रमणं होत आहेत. सत्ता मिळवा, पण तीसुद्धा आपल्याकडे लोकशाही आहे हे न विसरता प्रामाणिकपणे लोकांसमोर जाउन लोकांनी सत्ता दिली तर तुम्ही राज्य करा. पण आता सगळं मला हवंच, मतं नाही मिळाली तरी सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवीनच हा प्रकार देशाच्या राजकारणात नव्हता. त्यानी हे देशाचं राजकारण नासवून टाकलं आहे. विकृत करून टाकलं आहे. त्यातूनच देशात राज्य आणि केंद्र संघर्ष सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा आहे. केंद्रात बसलोय म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची या प्रवृत्तीचा सगळ्यांनी निषेध करायला हवा.

Shivsena – BJP alliance :

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात