कोरोना प्रतिबंधक लसींची उत्पादनक्षमता वाढणार, दरमहा कोव्हिशिल्डचे १२ कोटी तर कोव्हॅक्सिनचे ५.८ कोटी डोस तयार होणार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना फळ मिळाले आहे. देशात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड लसीचे दरमहा १२ कोटी तर मेड इन इंडिया भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे ५.८ कोटी डोस तयार होणार आहेत.Productivity of corona vaccines will increase, with 12 crore doses of covshield and 5.8 crore doses of covacin per month.

देशातील लसींचे वितरण यामुळे सुरळित होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दोन्ही लसींच्या उत्पादन क्षमतेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. कोव्हिशिल्डचे दरमहा ११ कोटी डोसेसचे उत्पादन होते. ही क्षमता १२ कोटी डोसपर्यंत वाढणार आहे. कोव्हॅक्स‍िनचीही क्षमता दरमहा २.५ कोटींवरून ५.८ डोसेस एवढी वाढणार आहे.



देशात विविध ठिकाणी कोव्हॅक्सिनचे लवकरच उत्पादन सुरू होणार आहे. महाराष्ट्रात हाफकीन बायफार्मासह हैदराबाद, गुजरात, चेन्नई इत्यादी ठिकाणी असलेल्या उत्पादन केंद्रामध्ये कोव्हॅक्सिनचे उत्पादन होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकतर्फे या लसींचे उत्पादन करण्यात येते.

लस पुरवठा वाढविण्यासाठी दोन्ही कंपन्यांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य तसेच सरकारच्या आॅर्डरसाठी आगावू पैसे देण्यात आल्याचीही माहिती आरोग्यमंत्री मांडविय यांनी दिली.देशात कोरोनाची पहिली लाट कमी झाल्यावर कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची नागरिकांची मानसिक तयारी नव्हती. त्यामुळे कंपन्यांनी उत्पादित केलेल्या लस पडून होत्या.

यावेळी मोदी सरकारने लसमैत्री उपक्रमाअंतर्गत काही लसी निर्यात केल्या होत्या. परंतु, दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढल्यावर अचानक लसीसाठी मागणी वाढू लागली. यावेळी कंपन्यांच्या उत्पादनाला मर्यादा होत्या.

यावेळी लसीच्या तुटवड्यावरून मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जाऊ लागली होती. मात्र, सरकारने उत्पादन वाढविण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. लसीचे वितरणही सुरळित ठेवण्यात आले. आता उत्पादन क्षमता वाढणार असल्याने भारतीयांना दिलासा मिळणार आहे.

Productivity of corona vaccines will increase, with 12 crore doses of covshield and 5.8 crore doses of covacin per month.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात