झाशीच्या राणीला योगी आदित्यनाथांचे अभिवादन, झाशी रेल्वे स्टेशनला देणार वीरांगणा लक्ष्मीबाई यांचे नाव


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना अनोखे अभिवादन केले आहे. झाशी रेल्वेस्टेशनचे नाव आता वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन असे होणार आहे.  Yogi Adityanath greets Queen of Jhashi, Jhashi Railway Station to name Veerangana Lakshmibai

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी अनेकदा जिथे गरज असेल तिथे नाव बदलले जाणार, असे म्हटले आहे. झाशी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती योगी सरकारकडून देण्यात आली आहे.

केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, झाशी रेल्वे स्टेशनचे नाव वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन करण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ठरलेल्या प्रक्रियेनुसार, संबंधित संस्थांशी चर्चा करुन त्यांचे मत मागवले जाईल. त्यानंतर नाव बदलण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. कोणत्याही ठिकाणाचे नाव बदलण्याची परवानगी रेल्वे मंत्रालय आणि डाक व भारतीय सर्वेक्षण विभागाच्या सहमतीनंतर गृह मंत्रालयाकडून मिळते.]

Yogi Adityanath greets Queen of Jhashi, Jhashi Railway Station to name Veerangana Lakshmibai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात