पंतप्रधान मोदींकडे आहे अवघी 37 हजारांची रोकड


मै तो फकीर हूँ. झोला लेकर चल पडूंगा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर कोट्यवधी भारतीय भाळतात. मोदी यांच्या संपत्तीबद्दलची माहिती पुढे आली आहे. किती आहेत त्यांच्याकडे सोन्याचे दागिने,? किती आहेत अलिशान वाहने,? कोणते शेयर्स आहेत? Prime Minister Modi’s net worth has jumped to ₹3.07 crore as per his latest declaration from 2.85 crore last year.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. पंतप्रधानांनीच त्यांच्या संकेतस्थळावरून दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार त्यांच्या संपत्तीचे मूल्य 3 कोटी 7 लाख रुपये झाले आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 2 कोटी 85 लाख रुपये होती. गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीचे मूल्य 22 लाख रुपयांनी वाढले आहे.

एकाहत्तर वर्षीय पंतप्रधानांच्या बँक खात्यात 1 लाख 52 हजार 480 रुपये आहेत. मार्च 31 रोजी त्यांच्याकडे असणारी रोकड अवघी 36 हजार 900 रुपये इतकीच आहे. तरीही गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली त्याचे कारण म्हणजे गांधीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात असणारी त्यांची फिक्स डिपॉझीट्स हे होय. गांधीनगरच्या त्यांच्या एसबीआय खात्यात त्यांच्या 1 कोटी 83 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. गेल्यावर्षीच्या 31 मार्चला हीच रक्कम 1 कोटी 60 लाख रुपये होती. यंदा त्यात व्याजाची रक्कम वाढली आहे.



मोदींचे शेयर्स, म्युचल फंड्स 

नरेंद्र मोदी यांची शेयर बाजारात कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांच्याकडे कोणतेही म्युचल फंडही नाहीत. राष्ट्रीय सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमध्ये त्यांनी 8 लाख 93 हजार 251 रुपये गुंतवले आहेत. त्यांच्याकडे 1 लाख 50 हजार 957 रुपयांच्या जीवन विमा पॉलिसी आहेत. त्यांनी सन 2012 मध्ये घेतलेले वीस हजार रुपयांचे एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर बॉंड्स आहेत.

मोदींवरील कर्ज पंतप्रधानांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. ते कोणाचेही देणेकरी नाहीत. त्यांच्या मालकीचे एकही वाहनसुद्धा नाही.

सोन्यातली गुंतवणूक किती?

पंतप्रधान मोदी यांच्याकडे 1 लाख 48 हजार 331 रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. त्यांच्या नावे 1.1 कोटी रुपयांची निवासी मालमत्ता आहे. मोदी कुटुंबाच्या एकत्रित मालमत्तेत त्यांचा 25 टक्के वाटा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी दोन महिने आधी 25 ऑक्टोबर 2002 ला त्यांनी निवासी मालमत्ता विकत घेतली. त्यावेळी त्या 3 हजार 531 स्क्वेअर फुट भूखंडांची किंमत 1.3 लाखांपेक्षा थोडी जास्त होती. सन 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांनी कोणतीही नवी मालमत्ता खरेदी केलेली नाही.

Prime Minister Modi’s net worth has jumped to 3.07 crore as per his latest declaration from 2.85 crore last year.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात