जो बायडन यांची कोरोना संकट संपवण्यासाठी वर्च्युअल परिषद

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ऑनलाईन बैठक बोलावली आहे. बुधवारी ही बैठक असल्याचे वाईटहाऊसने कळविले आहे. जागतिक नेते, नागरी अधिकारी, एनजीओ आणि उद्योग यांना एकत्र करून कोविड १९ संपवण्यासाठी संपविण्यासाठी एकत्रित रित्या प्रयत्न करण्यावर भर देणे हा या परिषदेचा उद्देश असेल.

Joe Biden to hold virtual summit for covid-19, Ending pandemic globally

युनायटेड स्टेट्सने जगभरातील देशांना आवाहन केले आहे की, कोरोना विरुद्धचे आपले हे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न भरीव प्रयत्न करणे गरजेचे आहे. लस उपल्ब्ध करून देणे, लसीकरण करणे, ऑक्सीजन उपल्ब्ध करून देणे, PPE Kits तसेच उपचाराच्या बाकी अनेक सुविधा उपलब्ध करून देणे, एकमेकांना साहाय्य करून चांगली आरोग्य सुरक्षा मिळण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे हे मार्ग ठरविले पाहिजेत.


जो बिडेन यांनी कोविड -१९ शॉट्सची अमेरिकेची जागतिक देणगी केली दुप्पट


बाइडन यांनी पहिल्यापासूनच जागतिक पातळीवर  तसेच अमेरिकेतील लोकांना कोविड संकट संपविण्यासाठी लस घेऊन हातभार लावावा असे आवाहन केले आहे. आपली या संकटाला सामोरे जाण्याची तयारी आहे. प्रत्येकानी यामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. सप्टेंबर 20 चा ट्विट मधे ते म्हणाले की, “ज्यांनी अजून लस घेतली नसेल त्यांनी त्वरित लस घ्यावी आणि ज्यांनी स्वतः लस घेतली असेल त्यांनी आपल्या कुटुंबाला व मित्रांना लस घेण्यास प्रोत्साहन द्यावे. या संकटावर सर्वांनी एकत्र येऊन मात करू.”

Joe Biden to hold virtual summit for covid-19, Ending pandemic globally

महत्त्वाच्या बातम्या