रक्षाबंधन : पंतप्रधान मोदींचे स्वच्छता तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मुलींबरोबर, तर शिंदे, फडणवीसांचे महिला पोलिसांबरोबर!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली/मुंबई : देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्सहात साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले शासकीय निवासस्थान 7, लोककल्याण मार्ग येथे स्वच्छता कर्मचारी, अन्य कर्मचारी यांच्या मुलींबरोबर रक्षाबंधन साजरे केले, तर मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पोलिसांबरोबर हा सण साजरा केला. Prime Minister Modi’s cleanliness as well as with the daughters of other employees

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोलीस भगिनींनी राखी बांधली. रक्षाबंधनाच्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनासमोरील पोलीस चौकीत भगिनीकडून राखी बांधून घेतली. त्यांच्यासह सर्वसामान्यांसह नेते मंडळी देखील राजकीय वर्तुळातील बहिणींसमान असलेल्या महिलांकडून तर काहीनी आपल्या बहिणींकडून राखी बांधून हा सण साजरा केला आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला आहे. गुरूवारी मोदींच्या कार्यालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, शिपाई, माळी आणि ड्रायव्हरच्या मुलींनी मोदींना राखी बांधली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी लहान मुलींसह मोदींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. पीएमओ कार्यालयाकडून याबाबत त्यांनी काही फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मोदींना राखी बांधणाऱ्या या मुली कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. परंतु, या मुली पंतप्रधान मोदींसह काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे मोदींसाठीही आजचा दिवस विशेष ठरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Prime Minister Modi’s cleanliness as well as with the daughters of other employees

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात