शिंदे – फडणवीसांचा दणका; ऊस नियंत्रण मंडळातील सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द!!


प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे-पवार सरकारने सरत्या काळात घेतलेले निर्णय स्थगित करण्याचा धडाका लावल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने आता अशासकीय नियुक्त्यांकडे मोर्चा वळवला आहे. त्यानुसार, ऊस नियंत्रण मंडळातील सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द करीत नव्या सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादीला दणका दिला आहे. Shinde – Fadnavis govt All non-official appointments in the Sugarcane Control Board cancelled

काँग्रेस, राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत

यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे माढ्यातील आमदार बबनराव शिंदे आणि इचलकरंजीचे काँग्रेस आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थक असलेल्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकरी प्रतिनिधींचा समावेश आहे. काहीच दिवसांपूर्वी याच बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.



पण आता ऊस नियंत्रण मंडळातील सर्व शासकीय नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने बाजार समित्यांपाठोपाठ सहकार क्षेत्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढण्याला वेग आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे २०२१ च्या शासन निर्णयन्वये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या ऊस नियंत्रण मंडळामध्ये अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. तथापि, यासंदर्भातील नवीन निर्देश विचारात घेऊन प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत असणारे सर्व उपक्रम, महामंडळे, मंडळे, समित्या आणि प्राधिकारणांवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Shinde – Fadnavis govt All non-official appointments in the Sugarcane Control Board cancelled

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात