Farmers Protest: दिल्लीच्या गाझीपूर आणि टिकरी बॉर्डर खुल्या होण्याची शक्यता, पोलिसांनी हटवले बॅरिकेडिंग हटवले


शेतकरी आंदोलनाला 11 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 11 महिन्यांनंतर पोलिसांनी टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवरून बॅरिकेडिंग हटवण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही सीमांचा एकेरी मार्ग खुला करण्याची तयारीही सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान रस्ता बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता बंद केला नसल्याचे सांगितले. दिल्ली पोलिसांनी रस्ता बंद केल्याचे ते म्हणाले. Police removed barricading from ghazipur delhi uttar pradesh border farmers protest


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला 11 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 11 महिन्यांनंतर पोलिसांनी टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवरून बॅरिकेडिंग हटवण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही सीमांचा एकेरी मार्ग खुला करण्याची तयारीही सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान रस्ता बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता बंद केला नसल्याचे सांगितले. दिल्ली पोलिसांनी रस्ता बंद केल्याचे ते म्हणाले.

पोलीस मार्ग मोकळे करण्यासाठी सज्ज

दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, पोलीसही मार्ग खुला करण्यास तयार आहेत, मात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, असे आश्वासन दिले पाहिजे. पोलीस आणि शेतकरी यांच्यात पूर्ण तोडगा निघेपर्यंत रस्ता बंद राहणार आहे.

सिमेंटचे बॅरिकेडही हटवण्यात आले

पोलिसांनी टिकरी सीमेवरील सिमेंटचे बॅरिकेडही हटवले आहे. यासोबतच रस्त्याच्या मधोमध लावलेले लोखंडी खिळेही काढण्यात आले आहेत. सद्यस्थितीत सिमेंटचा एक बॅरिकेड तसाच आहे.



सरकारच्या आदेशानंतर बॅरिकेड्स हटवले

दिल्ली-गाझीपूर सीमेवरील डीसीपी पूर्व प्रियंका कश्यप यांनी सांगितले की, बॅरिकेडिंग हटवले जात आहे. आम्ही ते एका तासात काढून टाकू. आम्हाला आदेश मिळाले आहेत, त्यामुळे आम्ही बॅरिकेडिंग हटवत आहोत. सध्या आम्ही महामार्गावरील बॅरिकेडिंग हटवत आहोत.

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासून टिकरी सीमेवर लावलेले बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत त्यातील एक रस्ता खुला केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर काही दिवसांनी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान शेतकरी संघटनांनी न्यायालयाला सांगितले होते की, दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी अडथळे उभे केले आहेत.

Police removed barricading from ghazipur delhi uttar pradesh border farmers protest

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात