केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढवला


केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ वाढवला आहे. पुढील ३ वर्षांसाठी त्यांची आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरुवारी रात्री उशिरा या निर्णयाला मंजुरी दिली. शक्तिकांत दास हे यापूर्वी अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार सचिव होते. आणि त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी RBI चे प्रमुख म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. Shaktikanta Das reappointed as RBI Governor for three more years


वृत्तसंस्था

मुंबई : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ वाढवला आहे. पुढील ३ वर्षांसाठी त्यांची आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरुवारी रात्री उशिरा या निर्णयाला मंजुरी दिली. शक्तिकांत दास हे यापूर्वी अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार सचिव होते. आणि त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी RBI चे प्रमुख म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

शक्तिकांत दास यांना शासनाच्या विविध क्षेत्रांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर, उद्योग इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.



भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील त्यांच्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी 8 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात थेट सहभाग घेतला होता. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना 2008 मध्ये पहिल्यांदाच शक्तिकांत दास यांची संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

शक्तिकांत दास यांनी जागतिक बँक, आशियाई विकास बँक (ADB), न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) मध्ये भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. IMF, G20, BRICS, SAARC इत्यादी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

RBI कायद्यानुसार सरकारला RBI गव्हर्नरचा कार्यकाळ ठरवता येतो. परंतु तो पाच वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. मात्र, सरकारची इच्छा असेल तर ते सलग दुसऱ्यांदा आरबीआयच्या गव्हर्नरपदावर कोणाचीही नियुक्ती करू शकतात. अलिकडच्या वर्षांत, फक्त एस. व्यंकटरमण यांचा कार्यकाळ रघुराम राजन यांच्यापेक्षा कमी होता. ते 2 वर्षे RBI गव्हर्नर होते.

Shaktikanta Das reappointed as RBI Governor for three more years

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात