दानशूर अझीम प्रेमजी : गत आर्थिक वर्षात दररोज २७ कोटींची दिले दान; आणखी कुणी-कुणी दिली देणगी? वाचा सविस्तर…


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 9,713 कोटी रुपये म्हणजेच दररोज 27 कोटी रुपयांचे दान केले. यासह, त्यांनी सेवाभावी कार्य करणाऱ्या भारतीयांमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले. EdelGive Hurun India Philanthropy List 2021 नुसार, प्रेमजींनी महामारीग्रस्त वर्षात त्यांच्या देणग्या जवळपास एक चतुर्थांशने वाढवल्या. त्यांच्या खालोखाल एचसीएलचे शिव नाडर होते, ज्यांनी धर्मादाय कारणांसाठी 1,263 कोटी रुपयांची देणगी दिली. Premji donated Rs 27cr per day in FY21, retains top giver rank



आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 577 कोटी रुपयांच्या योगदानासह यादीत तिसरे आणि कुमार मंगलम बिर्ला 377 कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आहेत. देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे आपत्ती निवारणासाठी 130 कोटी देणगीसह देणगीदारांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.

इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून 183 कोटी रुपयांच्या देणगीसह ते यादीत पाचव्या स्थानावर आहेत. टॉप टेन देणगीदारांमध्ये हिंदुजा कुटुंब, बजाज कुटुंब, अनिल अग्रवाल आणि बर्मन कुटुंबाचा समावेश आहे.

Premji donated Rs 27cr per day in FY21, retains top giver rank

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात