एक पंतप्रधान असाही : इम्रान खान यांनी सौदीकडून गिफ्ट मिळालेले १६ कोटींचे घड्याळ-झुमके विकले, देशाला जरासुद्धा लागू दिली नाही चाहूल


परदेश दौऱ्यांवर असताना देशाच्या प्रमुखांना भेटवस्तू मिळणे ही सामान्य बाब आहे. हे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधानांसोबत घडत असते. सामान्य नियम असा आहे की, पंतप्रधान असलेली व्यक्ती जबाबदार मंत्रालयाला या भेटवस्तूंची माहिती देते, परंतु पाकिस्तानात मात्र विपरीत घडले आहे. पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी यांनी देशाला माहिती न देता कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू परस्पर विकल्याचा आरोप आहे. हा खळबळजनक खुलासा एका पत्रकाराने केला आहे. यामुळे या प्रकरणाची चर्चा पाकिस्तानातच नव्हे तर जगभरात सुरू आहे. कारण कदाचित सुसंस्कृत जगात हे यापूर्वी कधीच घडले नसावे. Pakistan PM Imran Khan Gifts Scam, Imran khan Sold Expensive Watch And Earrings gifted by Saudi prince


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : परदेश दौऱ्यांवर असताना देशाच्या प्रमुखांना भेटवस्तू मिळणे ही सामान्य बाब आहे. हे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधानांसोबत घडत असते. सामान्य नियम असा आहे की, पंतप्रधान असलेली व्यक्ती जबाबदार मंत्रालयाला या भेटवस्तूंची माहिती देते, परंतु पाकिस्तानात मात्र विपरीत घडले आहे. पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी यांनी देशाला माहिती न देता कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू परस्पर विकल्याचा आरोप आहे. हा खळबळजनक खुलासा एका पत्रकाराने केला आहे. यामुळे या प्रकरणाची चर्चा पाकिस्तानातच नव्हे तर जगभरात सुरू आहे. कारण कदाचित सुसंस्कृत जगात हे यापूर्वी कधीच घडले नसावे.

काय आहे प्रकरण?

2018 मध्ये इम्रान खान पंतप्रधान झाले. त्यांनी सौदी अरेबियासह अनेक देशांना भेट दिली. तेथे राजकुमार मोहम्मद बिन सलमान (एमबीएस) यांनी इम्रान यांना महागडे मनगटी घड्याळ भेट दिले. अबरार खालिद नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीने माहिती आयोगाकडे अर्ज दाखल केला. त्यांनी म्हटले की, इम्रान खान यांना इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल माहिती दिली पाहिजे. त्यांना उत्तर मिळाले की, भेटवस्तूंची माहिती देता येत नाही. खालिदही जिद्दी निघाले. त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसे, हेदेखील एक तथ्य आहे की, इम्रान खान यांनी बनी गालामध्ये त्यांचे आलिशान घर त्यांना भेट म्हणून मिळालेले आहे असे अनेक वेळा सांगितले आहे, पण ते कोणी दिले हे ते सांगत नाहीत.

इम्रान सरकारकडून बचावाचे प्रयत्न

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान सरकारला विचारले – तुम्ही लोकांना भेटवस्तूंची माहिती का देत नाही? सरकारचे वकील म्हणाले – यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे. याशिवाय इतर देशांशी आपले संबंध बिघडू शकतात. त्यामुळे इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती लोकांना देता येत नाही.



पाकिस्तानी पत्रकार आक्रमक

पाकिस्तानी पत्रकारांच्या मते आरिफ अजाकिया आणि इमदाद अली शुमरो- इम्रान यांना सौदी एमबीएसने सोन्याचे बनवलेले आणि हिऱ्यांनी जडलेले एक अनमोल मनगटाचे घड्याळ भेट दिले. त्यांनी दोन लिमिटेड एडिशन घड्याळे बनवली होती. एक स्वतःकडे ठेवले. दुसरे इम्रान खान यांना भेट देण्यात आले. त्यांची किंमत तब्बल 16 कोटी रुपये होती.

बुशरा बीबीची एंट्री इम्रान घरी आली आणि हे मनगटी घड्याळ पिंकी पेरनी (पत्नी बुशरा बीबी) ला घालण्यासाठी दिले. बुशरा यांनी जाऊन हे घड्याळ एका कर्मचाऱ्याला दिले, किंमत जाणून घेण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने सांगितले की ते खूप महाग आहे. बुशरा यांनी कर्मचाऱ्याला ते विकण्यास सांगितले. ब्रँडेड घड्याळ पाहून शोरूमच्या मालकाने त्याच्या उत्पादन कंपनीला बोलावले आणि येथूनच इम्रान खान यांचा कारनामा उघड झाला. निर्मात्यांनी थेट MBS कार्यालयाशी संपर्क साधला आणि सांगितले की, तुम्ही बनवलेल्या 2 घड्याळांपैकी एक घड्याळ विक्रीसाठी आले आहे. तुम्ही हे पाठवले की ते चोरीला गेले?

काय आहे नियम?

पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार आलिया शाह यांच्या मते – पाकिस्तानातील लोकांना पंतप्रधानांनी, राष्ट्रपतींनी किंवा अन्य कार्यालयाला मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती द्यावी लागते. ते तोशाखान्यात जमा करावे लागतात. जर भेटवस्तूची किंमत 10 हजार पाकिस्तानी रुपये असेल तर संबंधित व्यक्ती कोणतेही पैसे न देता ती ठेवू शकते. जर ते 10 हजारांपेक्षा जास्त असेल तर भेट 20% किंमत देऊन तुमच्याकडे ठेवली जाऊ शकते. जर भेट 4 लाखांपेक्षा जास्त असेल तर फक्त वजीर-ए-आझम (पंतप्रधान) किंवा सदर-ए-रियासत (राष्ट्रपती) ते खरेदी करू शकतात. जर कोणी खरेदी केले नाही तर लिलाव होतो.

दुसरीकडे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा वेळोवेळी जाहीर लिलाव करून ती रक्कम लोककल्याणासाठी वापरतात हे अवघ्या देशाने पाहिले आहे.

Pakistan PM Imran Khan Gifts Scam, Imran khan Sold Expensive Watch And Earrings gifted by Saudi prince

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात