मोदी सरकारवर निशाणा साधत ओवैसी म्हणाले: अफगाणची चिंता सोडा; आधी देशातील अल्पसंख्याकांची काळजी घ्या


असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे वक्तव्य आले आहे.  त्यांनी म्हटले आहे की, ओवेसी यांना अफगाणिस्तानला पाठवा. त्यांनी तिथे जाऊन आपल्या महिलांची आणि समाजाची काळजी घ्यावी. Owaisi, while targeting the Modi government, said, “Leave the worries of Afghanistan, take care of your country first.”


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मुद्द्यावर असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे वक्तव्य आले आहे.  त्यांनी म्हटले आहे की, ओवेसी यांना अफगाणिस्तानला पाठवा. त्याने तिथे जाऊन आपल्या महिलांची आणि समाजाची काळजी घ्यावी.

असदुद्दीन ओवैसी यांचं काय होतं वक्तव्य

हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी गुरुवारी रात्री AIMIM च्या कार्यक्रमात म्हटले होते की, भारत सरकारला अफगाणिस्तानमध्ये असलेल्या महिलांची जास्त काळजी आहे, परंतु, ते त्यांच्या महिलांबाबत काहीच बोलत नाहीत.  भारतात पाच वर्षांखालील नऊ मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो. महिलांवरील गुन्हे आणि बलात्काराच्या घटना येथे सतत वाढत आहेत. पण सरकारची चिंता अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या महिलांबद्दल अधिक आहे.



ओवैसी म्हणाले की, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानला झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अल कायदासारख्या दहशतवादी संघटना पुन्हा अफगाणिस्तानच्या काही भागात सक्रिय झाल्या आहेत. आयएसआय आधीच भारताचा शत्रू आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, तालिबानचे नियंत्रण आयएसआय करते आणि तालिबान हा त्यांच्या हातातील कठपुतळी आहे.

हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी यापूर्वीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका ट्विटद्वारे म्हटले होते की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार निश्चित आहे.  2013 च्या सुरुवातीला, मी सरकारला आमचे धोरणात्मक हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी तालिबानशी संवाद स्थापित करण्याचा सल्ला दिला. आम्ही अफगाणिस्तानात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, पण सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही

Owaisi, while targeting the Modi government, said, “Leave the worries of Afghanistan, take care of your country first.”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात