वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : तमिळनाडूत दोन आठवड्यांपासून पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले. मात्र आता केरळमध्ये पावसाची धोक्याची घंटा वाजली आहे. तमिळनाडूपाठोपाठ आता केरळमध्ये सहा जिल्ह्यात ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या १६ डिसेंबरपर्यंत केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. Orange alert in Kerala now
हवामान खात्याने केरळमध्ये ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. त्यात सहा जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या चार दिवसांत तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला. केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठानमथिट्टा, अलपुझ्झा, कोट्ट्याम, एर्नाकुलम आणि इडुक्की पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी अंदमान आणि निकोबार येथेही पंधरा नोव्हेंबरला विविध ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
दरम्यान, तमिळनाडूत पावसाने थैमान घातल्यामुळे मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मदतकार्याला वेग आला आहे. पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तमिळनाडू सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App