वृत्तसंस्था
आझमगड : योगी आदित्यनाथ यांनी पूर्वांचलला डास आणि माफियांपासून मुक्त केले आहे. आपण (अखिलेश) तर या ठिकाणी साफसफाई देखील करत नव्हता. सवर्त्र डासांचेच राज्य होते. संपूर्ण पूर्वांचलमध्ये मेंदूज्वराने बालक मृत्युमुखी पडत होते. मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला योगी सरकारने प्रत्यक्षात आणले आणि पूर्वांचलला डासमुक्त केले, अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले. Amit Shah targets Akhilesh Yadav
आझमगड हा अखिलेश यादव यांचा गड मानला जातो. याचा संदर्भ घेत अमित शहा म्हणाले की, आझमगडला समाजवादी पक्षाच्या काळात कट्टर विचारसरणी आणि दहशतवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जात होते. त्याच भूमीत आता माता सरस्वतीची उपासना केली जात आहे. ही भूमी बाबा विश्वानाथ, प्रभू श्रीरामाची, संत कबीर, गुरू गोरखनाथची आहे. या ठिकाणी सरस्वतीचे मंदिर साकार होत आहे. ही तर नव्या बदलाची सुरवात आहे. शहा म्हणाले, निवडणुका येताच मतदारांना जात-धार्मिक आधारावर विभागणी केली जाते. लांगुलचालन आणि व्होटबँकचे राजकारण केले जात आहे. अखिलेश यादव यांना जिना महान वाटू लागले आहेत,
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App