विरोधकांनीच वाढविली सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठीचा खर्च ! १३०० कोटींचा खर्च आणि २० हजार कोटींचा म्हणून टीका


पंतप्रधानांच्या निवासस्थानासह सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठीचा खर्च १३०० कोटी रुपये आहे. मात्र, विरोधकांनीच त्याची किंमत वाढवून २० हजार कोटी रुपये केली असून सरकारवर टीका सुरू केली आहे.Opposition raises costs for Central Vista project, actual expenditure 1300 crore and saying 20,000 crore


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधानांच्या निवासस्थानासह सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठीचा खर्च १३०० कोटी रुपये आहे. मात्र, विरोधकांनीच त्याची किंमत वाढवून २० हजार कोटी रुपये केली असून सरकारवर टीका सुरू केली आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची आखणी डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी खर्च करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.मात्र, केंद्र सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधक या प्रकल्पाची किंमत चढवून सांगत असल्याचे म्हटले. नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पूरी यांनी म्हटले आहे की, सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टसाठी 20 हजार कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती चुकीची आहे.

सेंट्रल व्हिस्टा एवेन्ह्यूसाठी 477 कोटी तर नव्या संसद भवनासाठी 862 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा सगळा खर्च मिळून 1300 कोटींच्या घरात जातो. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही.

या प्रकल्पासाठी कोणतीही वृक्षतोड केली जाणार नाही. या प्रकल्पाच्या बांधकामावेळी प्रदूषण टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

या या प्रकल्पासाठी अनेक ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्यात येणार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मात्र, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी इंडिया गेट, संसद, उत्तर आणि दक्षिण ब्लॉक, राष्ट्रीय अभिलेखागार यापैकी कोणतीही सूचीबद्ध वास्तू पाडली जाणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानासाठी 13,450 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकल्पातंर्गत एकूण 10 इमारती बांधण्यात येणार आहेत.

अद्याप यासाठीचे टेंडरही निघालेले नाही. विरोधक खचार्चा आकडा वाढवून सांगत असल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पूरी यांनी म्हटले. संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी टाटा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहे. ही वास्तू त्रिकोणी आकाराची असेल. संसद भवनाच्या इमारतीसाठी साधारण 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही इमारत 2022 पर्यंत बांधून तयार होईल, असा अंदाज आहे.

Opposition raises costs for Central Vista project, actual expenditure 1300 crore and saying 20,000 crore

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती