मुस्लिम महिलांनंतर हिंदू महिलांचीही बदनामी : टेलिग्राम चॅनलवर शेअर होत होते हिंदू महिलांचे अश्लील फोटो, केंद्र सरकारने केले ब्लॉक

Obscene pictures of Hindu women were being shared on Telegram channel, government blocked

Telegram channel : केंद्र सरकारने एका टेलिग्राम चॅनलला ब्लॉक केले आहे. या चॅनलवर हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर केले जात होते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. नुकतेच ‘बुल्ली बाई अॅप’बाबत असाच वाद समोर आला होता. अॅपवर मुस्लिम महिलांची छायाचित्रे अपमानास्पद पद्धतीने शेअर केली जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. याप्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे. Obscene pictures of Hindu women were being shared on Telegram channel, government blocked


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एका टेलिग्राम चॅनलला ब्लॉक केले आहे. या चॅनलवर हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर केले जात होते. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. नुकतेच ‘बुल्ली बाई अॅप’बाबत असाच वाद समोर आला होता. अॅपवर मुस्लिम महिलांची छायाचित्रे अपमानास्पद पद्धतीने शेअर केली जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. याप्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

या चॅनलवर कारवाई करत सरकारने कोणत्याही समाजातील महिलेचा अनादर खपवून घेतला जाणार नसल्याचे दाखवून दिले आहे. यासंबंधित मीरा मोहंती यांनी आयटी मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांना टॅग करत ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यावर रिप्लाय देत मंत्री वैष्णव यांनी ते चॅनल ब्लॉक केले असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय भारत सरकार पोलीस व राज्यासोबत कारवाईबाबत समन्वय साधत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘बुली बाय’ अॅप प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी उत्तराखंडमधून आणखी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. मयंक रावत (21) नावाच्या विद्यार्थ्याला बुधवारी पहाटे उत्तराखंडमधून अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी मुख्य आरोपी श्वेता सिंग (19) यांना उत्तराखंडमधून आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी विशाल कुमार झा (21) याला बंगळुरूमधून अटक केली होती.

‘गिटहब’ या ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर ‘बुली बाय’ अॅपवर परवानगी न घेता शेकडो मुस्लिम महिलांची बनावट छायाचित्रे अपलोड केल्याच्या तक्रारींनंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. मुंबई सायबर पोलीस स्टेशनने अॅपच्या अनोळखी डेव्हलपर्स आणि त्याची जाहिरात करणाऱ्या ट्विटर हँडलविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

प्रत्यक्षात असा कोणताही ‘लिलाव’ किंवा ‘विक्री’ नव्हती, परंतु काही निवडक महिलांना अपमानित करणे आणि त्यांना धमकावण्याचा हेतू या अॅपचा असल्याचे दिसते. यातील अनेक महिला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

Obscene pictures of Hindu women were being shared on Telegram channel, government blocked

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात