गांधीजींच्या चळवळीमुळे नव्हे, तर नेताजींच्या आझाद हिंद फौजेमुळे देश स्वतंत्र ; अर्धेंदू बोस


वृत्तसंस्था

कोलकाता : गांधीजींच्या चळवळीमुळे, नव्हे तर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेच्या प्रयत्नांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, असे प्रतिपादन नेताजींचे पुतणे अर्धेंदू बोस यांनी केले आहे. नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.Not because of Gandhiji’s movement, but because of Netaji’s Azad Hind Fauj: Ardhendu Bose

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी एक भ्रामक संकल्पना पसरवली, “दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल”. त्या वेळच्या राज्यकर्त्यांची ती गरज होती. कारण त्यावेळी नेताजींशी अनेकांचे राजकीय वैर होते. पण देशाला स्वातंत्र्य मात्र नेताजींच्या आझाद हिंद फौजेच्या प्रयत्नांमुळेच मिळाले, असे अर्धेंदू बोस यांनी स्पष्ट केले.



अर्धेंदू बोस म्हणाले, की त्या वेळच्या ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड क्लेमेंट ॲटली यांनी देखील ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याची कबुली दिली की कोणत्याही अहिंसक चळवळीमुळे ब्रिटन भारता बाहेर पडला नाही, तर आझाद हिंद फौजेच्या प्रेरणेतून ब्रिटिशांशी एकनिष्ठ असणाऱ्या सैनिकांनी बंडाचा पवित्रा स्वीकारला होता त्यामुळे ब्रिटिशांनी भारतावर राज्य करता आले नाही.

त्यामुळे देशाला स्वातंत्र्य देणे भाग पडले याची आठवण त्यांनी करून दिली. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद फौज यांची फार कमी माहिती देण्यात आली आहे आणि अहिंसक चळवळीची भरमार केली आहे त्यामुळे आजही युवकांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयीचा खरा इतिहास माहिती नाही, असाही असाही आरोप अर्धेंदू बोस यांनी केला आहे.

Not because of Gandhiji’s movement, but because of Netaji’s Azad Hind Fauj: Ardhendu Bose

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात