तस्लिमा नसरीन यांचे आता सरोगसीवर प्रश्न, म्हणाल्या – पालक ‘रेडीमेड चाइल्ड’शी भावनिकरीत्या कसे जोडू शकतात?

Taslima Nasreen question on surrogacy now, she said - how can parents emotionally connect with readymade child

Taslima Nasreen : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सरोगसीच्या माध्यमातून महिला माता होण्याबाबत असे वक्तव्य केले की सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तस्लिमा यांनी सरोगसी प्रक्रियेतून माता बनणाऱ्या महिलांवर टीका करत त्यांच्या मुलाप्रति असलेल्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. Taslima Nasreen question on surrogacy now, she said – how can parents emotionally connect with readymade child


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सरोगसीच्या माध्यमातून महिला माता होण्याबाबत असे वक्तव्य केले की सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तस्लिमा यांनी सरोगसी प्रक्रियेतून माता बनणाऱ्या महिलांवर टीका करत त्यांच्या मुलाप्रति असलेल्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एका ट्विटमध्ये आपले मत व्यक्त करताना नसरीन यांनी विचारले की, ज्या मातांना सरोगसीद्वारे रेडिमेड मुलं जन्माला घालतात, त्या मातांना जन्म देणाऱ्या मातांसारख्याच भावना असतात का?

अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास सरोगसी प्रक्रियेद्वारे पालक बनले आहेत. सोशल मीडियावर ट्विट करून त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली. दरम्यान, तस्लिमाचे हे ट्विट प्रियांका चोप्राशी जोडून पाहिले जात आहे. तथापि, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रियांका चोप्राचा उल्लेख केलेला नाही.

गरीब महिलांमुळे सरोगसी शक्य

तस्लिमा पुढे लिहितात, “गरीब महिलांमुळेच सरोगसीच्या माध्यमातून आई बनण्याची ही पद्धत शक्य झाली आहे. श्रीमंत लोकांना त्यांच्या स्वार्थासाठी समाजात नेहमीच गरिबी पाहायची असते.” त्या म्हणाल्या की, एखाद्या कुटुंबाला मूल वाढवायचे असेल तर बेघरांना दत्तक घ्या. मुलांना तुमच्या गुणांचा वारसा मिळाला पाहिजे, असे आम्हाला वाटते. ही फक्त स्वार्थी कल्पना आहे.

दुसरीकडे, हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॉमेंटमध्ये बरेच युजर्स मानतात की ही एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक निवड आहे, त्यांना त्यांच्या आवडीचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच वेळी काही युजर्स मानतात की काहीवेळा लोक वैद्यकीय कारणांमुळे सरोगसीचा मार्ग निवडतात.

Taslima Nasreen question on surrogacy now, she said – how can parents emotionally connect with readymade child

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात