अमेरिकेत कोरोनावरील औषधाच्या दिशेने नवे आश्वासक पाउल


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : दोन प्रकारच्या प्रतिपिंडांचा वापर करून केलेले उपचार कोरोनाविरोधात प्रभावी ठरत असल्याचे उंदरावरील संशोधनात दिसून आले आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी वेगवेळ्या प्रकारे प्रतिपिंड एकत्र करून कोरोना विषाणूविरोधात त्याची चाचणी घेतली असून तयार होणारे औषध उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. New Drug will impactful against corona



दोन प्रतिपिंडांचा वापर करून तयार केलेले औषध उपयुक्त असून ते कोरोना विषाणूचा प्रभाव नष्ट करते, असे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत उंदरांवर प्रयोग केले. कोरोना विषाणूच्या आतापर्यंत आढळून आलेल्या सर्व प्रकारांवर हे औषध उपयुक्त ठरत आहेत. प्रयोगशाळेत तयार केलेली प्रतिपिंडे ही शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या प्रतिपिंडांप्रमाणेच असतात.

शास्त्रज्ञांनी अल्फा, बिटा, गॅमा आणि डेल्टा या कोरोना विषाणूच्या प्रकारांची चाचणी घेतली. त्यानंतर त्यांनी उंदरांमध्ये निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांचा अभ्यास केला. शास्त्रज्ञांनी उंदरांमध्ये इंजेक्शनद्वारे प्रतिपिंडे सोडली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या शरीरात विषाणू सोडला गेला. यानंतर उंदरांचे सहा दिवस निरीक्षण करण्यात आले. प्रतिपिंडे शरीरात सोडलेल्या उंदरांमध्ये विषाणूविरोधात लढण्याची क्षमता अधिक निर्माण झाल्याचे आढळून आले.

New Drug will impactful against corona

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात