शोषणाविरुध्द लढतोय म्हणणाऱ्या नक्षलवाद्यांचा बुरखा फाटला, मुलींची नसबंदी करून केले जाते लैंगिक शोषण


विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : शोषणविरहित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी लढतोय म्हणणाºया नक्षलवाद्यांचा बुरखा आत्मसमर्पण केलेल एका महिला कमांडरने फाडला आहे.नक्षलवाद्यांकडून महिलांचे लैंगिक शोषण केले जात आहे. त्यासाठी त्यांची नसबंदीही केली जात असल्याची धक्कादायक माहिती एका आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी महिला कमांडरने दिली आहे.Naxals who say they are fighting against exploitation have their veils torn off, fellow comrade girls sexually exploited

एका महिला कमांडरने नुकतेच आत्मसमर्पण केले. यावेळी नक्षलवाद्यांनाकडून त्यांच्य सहकाºयांच्या लैंगिक छळाची कहाणी सांगितली. आदिवासींच्या शोषणाविरुद्ध क्रांतिकारी लढा देण्याच्या नावाखाली अल्पवयीन आदिवासी मुला-मुलींना नक्षल चळवळीत भरती केले जाते. पण प्रत्यक्षात त्यांची नसबंदी करून महिला नक्षलींवर लैंगिक अत्याचार केले जातात.



अल्पवयीन मुला-मुलींना भूलथापा देऊन नक्षली आई-वडिलांपासून विभक्त करतात. जंगलात नेऊन त्यांचे बालपण हिरावून घेतात व त्यांच्या हातात जबरीने शस्त्र देऊन त्यांचा नाहक बळी घेतात. शहीद सप्ताहात नक्षलवादी गावात शिरून बंदुकीच्या जोरावर विध्वंसक कृत्य करून विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करतात.

आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या सुरजागड लोहखनिज प्रकल्पातही त्यांनी अडथळे आणले. त्यामुळे नक्षलवाद्यांना आदिवासी समाजाचा विकास करायचा नाही हे स्पष्ट असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.

नक्षलवादी आपले अपयश झाकण्यासाठी मागील वर्षी महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड झोनमध्ये फक्त ८ नक्षली मारले गेल्याचा अपप्रचार करत आहेत. वास्तविक केवळ महाराष्ट्रात २०२० मध्ये १८ तर २०२१ मध्ये २२ असे गेल्या दीड वर्षात ४० नक्षली मारले गेले असल्याचाही दावा पोलीसांनी केला आहे.

Naxals who say they are fighting against exploitation have their veils torn off, fellow comrade girls sexually exploited

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात