छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा पुन्हा उच्छाद, आयईडी स्फोटात तीन जवान हुतात्मा, १४ जखमी

वृत्तसंस्था

रायपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडीच्या स्फोटात जिल्हा सुरक्षा दलाचे तीन जवान हुतात्मा झाले तर गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या भागातील आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा नक्षलवादी हल्ला असल्याचे सूत्रांनी सांगितले. Naxale attack in Chhattisgarh

जवानांना घेऊन जाणारी बस एका नाल्यावरील पूल ओलांडत असताना नक्षलवाद्यांनी तिथे पुरलेल्या आयईडीचा स्फोट घडवून आणला. या हल्ल्यामध्ये चौघेजण हुतात्मा झाले असून त्यामध्ये तीन जवान आणि एका बस चालकाचा समावेश असल्याचे बस्तर रेंजचे पोलिस महासंचालक पी. सुंदरराज यांनी सांगितले.या घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी अतिरिक्त कुमक रवाना केली आहे. या गाडीतून २४ जवान प्रवास करत होते. या स्फोटामध्ये अन्य आठ जवान जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अन्य बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी जवानांना आणण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना झाले आहे.

Naxale attack in Chhattisgarh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*