राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू -काश्मीरमधील 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. कुलगाम, बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनागमध्ये कारवाई सुरू आहे. व्हॉइस ऑफ हिंद मासिकाशी संबंधित प्रकरणांमध्ये ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) कमांडर सज्जाद गुल याच्या घरावरही छापा टाकला आहे. National Investigation Agency NIA Raids 16 Places In Jammu & Kashmir In Connection With Cases Of The Publication
वृत्तसंस्था
श्रीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू -काश्मीरमधील 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. कुलगाम, बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनागमध्ये कारवाई सुरू आहे. व्हॉइस ऑफ हिंद मासिकाशी संबंधित प्रकरणांमध्ये ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) कमांडर सज्जाद गुल याच्या घरावरही छापा टाकला आहे.
जम्मू -काश्मीरमधील 16 ठिकाणी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ मासिकाचे प्रकाशन (ज्याचा उद्देश तरुणांना भडकवणे आणि कट्टरपंथी बनवणे) आणि आयईडी रिकव्हरी संदर्भात आहे. यामध्ये एजाज अहमद टाक, मुदासिर अहमद अहंगर, नासिर मंजूर मीर आणि जुनैद हुसेन खान यांना अचबल पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे, त्यांची चौकशी सुरू आहे.
या महिन्यात काश्मीर खोऱ्यात टारगेट किलिंग केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून 500 हून अधिक तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांमध्ये दगडफेक करणारे, OGWच्या संशयित यादीतील तरुण आणि जमात-ए-इस्लामी आणि तहरीक-ए-हुर्रियतशी संबंधित कार्यकर्ते आहेत. केंद्रातून पाठवलेले वरिष्ठ आयबी अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App