फार्मास्युटिकल ग्रुपच्या ६ राज्यांमधील ५० जागांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड

Income Tax raids on Hetero pharmaceutical group Information by Central Board of Direct Taxes

Income Tax raids on Hetero pharmaceutical : प्राप्तिकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हैदराबाद स्थित औषध कंपनीच्या ५० जागांवर छापे टाकले. या छाप्यांदरम्यान १४२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. हे छापे 6 राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले. सीबीडीटीच्या मते, आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. Income Tax raids on Hetero pharmaceutical group Information by Central Board of Direct Taxes


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हैदराबाद स्थित औषध कंपनीच्या ५० जागांवर छापे टाकले. या छाप्यांदरम्यान १४२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. हे छापे 6 राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले. सीबीडीटीच्या मते, आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे.

हैदराबाद स्थित हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर नुकत्याच झालेल्या छाप्यांनंतर प्राप्तिकर विभागाने 550 कोटी रुपयांचे ‘बेहिशेबी’ उत्पन्न शोधले आणि 142 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त केली. सध्या या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 6 ऑक्टोबर रोजी प्राप्तिकर विभागाने सुमारे सहा राज्यांमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापे टाकले.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने एका निवेदनात म्हटले आहे, “छाप्यांदरम्यान अनेक बँक लॉकर्स सापडले त्यापैकी 16 कार्यरत होते. या छाप्यांमध्ये आतापर्यंत 142.87 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.

हे छापे हैदराबादस्थित हेटेरो फार्मा समूहाशी संबंधित असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. सीबीडीटीने म्हटले की, पुढील तपास सुरू आहे. सीबीडीटी प्राप्तिकर विभागासाठी धोरण तयार करते. सीबीडीटीने म्हटले आहे की, हा समूह फार्मास्युटिकल घटक (एपीआय) इत्यादींच्या व्यवसायात आहे आणि बहुतेक उत्पादने अमेरिका आणि दुबई आणि काही आफ्रिकन आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातात.

Income Tax raids on Hetero pharmaceutical group Information by Central Board of Direct Taxes

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात