कॉंग्रेसची 16 ऑक्टोबरला CWCची बैठक, संघटनात्मक निवडणुका आणि पक्षाच्या गळतीवर होणार मंथन, पक्षाध्यक्ष निवडीचा मुहूर्त लागणार?

Congress calls CWC meeting on October 16, will discuss organizational elections and assembly elections Tweet By KC Venugopal

Congress calls CWC meeting on October 16 : काँग्रेसच्या ‘जी 23’ गटातील नेत्यांनी पक्षात संवादाची केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आणि अनेक नेत्यांनी अलिकडच्या महिन्यांत पक्ष सोडण्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक (CWC) 16 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. संघटनात्मक निवडणुका, आगामी विधानसभा निवडणुका आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर यात चर्चा होईल. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली. Congress calls CWC meeting on October 16, will discuss organizational elections and assembly elections Tweet By KC Venugopal


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘जी 23’ गटातील नेत्यांनी पक्षात संवादाची केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आणि अनेक नेत्यांनी अलिकडच्या महिन्यांत पक्ष सोडण्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक (CWC) 16 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. संघटनात्मक निवडणुका, आगामी विधानसभा निवडणुका आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर यात चर्चा होईल. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली.

ते म्हणाले, “सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यालय 24 अकबर रोड येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.” काँग्रेस कार्यकारिणी ही काँग्रेसची निर्णय घेणारी संस्था आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आधीच सूचित केले आहे की, CWCची बैठक लवकरच बोलावली जाईल.

अलीकडेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी सीडब्ल्यूसीची बैठक घेण्याची मागणी केली होती. आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची तत्काळ बैठक घेण्याचे आवाहन केले होते. सिब्बल यांनी पक्षाच्या पंजाब युनिटमधील गोंधळाच्या दरम्यान पक्ष नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते आणि म्हटले होते की, परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली पाहिजे. संघटनात्मक निवडणुकाही घेण्यात याव्यात.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवड प्रलंबित

अलीकडेच सुष्मिता देव, जितिन प्रसाद, लुईझिन्हो फालेरो आणि इतर अनेक नेते गेल्या काही महिन्यांत काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहेत. काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही या अर्थाने महत्त्वाची आहे. पक्षाध्यक्षांची निवडही दीर्घ काळापासून प्रलंबित आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना महामारीमुळे पक्षाध्यक्षपदाची निवड पुढे ढकलण्यात आली होती, जी आधी जून महिन्यात प्रस्तावित होती.

असे मानले जाते की CWCच्या या बैठकीत, काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात एक तारीख किंवा चौकट निश्चित केली जाऊ शकते. काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, या बैठकीत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा केली जाईल. पुढील वर्षांच्या सुरुवातीला या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

Congress calls CWC meeting on October 16, will discuss organizational elections and assembly elections Tweet By KC Venugopal

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था