चिपी विमानतळाच्या उद्घाटनात “विकासाचे अलायन्स” म्हणत ठाकरे – राणे यांचे एकमेकांना टक्के – टोणपे


प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप – शिवसेना – काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या विकासाचे अलायन्स झाले आहे. कारण इथं अलायन्स विमान उतरले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्याच वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी आपापल्या भाषणांमध्ये एकमेकांना टक्के – टोणपेही देऊन घेतले.In the inauguration of Chippewa Airport, Thackeray and Rane called each other “Alliance of Development”

याची सुरुवात नारायण राणे यांनी केली विमानतळाच्या श्रेयवादावरून त्यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडले सिंधुदुर्ग ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे इतरांनी आपण केले अमुक केले तमुक केले सांगू नये, अशा शब्दात त्यांनी विनायक राऊतांना सुनावले. तुम्ही मला पेढा देत आहात पण त्यातला गोडवा तुम्ही आत्मसात करा, असा सल्ला नारायण राणे यांनी विनायक राऊत यांना दिला.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नारायण राणे यांच्यावर प्रहार करताना जास्तीत जास्त उल्लेख नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी वेळ दिल्याने हे उद्घाटन होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नारायण राणे यांनी देखील चिपी विमानतळासाठी काही काम केले आहे. त्याच्याबद्दल त्यांना श्रेय देण्यात येतेच. परंतु कोकणची जनता झोपलेली नाही. कोकणची जनता सर्व पाहत आहे. त्यामुळे कोकणातल्या जनतेने ज्या खासदाराला निवडून दिले त्या विनायक राऊत यांचा मला अभिमान आहे, अशा शब्दात नारायण राणे यांना टोला द्यायलाही मुख्यमंत्र्यांनी कमी केले नाही.

सर्व पक्षांचे विकासासाठी अलायन्स असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. आपण राजकीय भाषण करायला आलो नाही, असे म्हणून त्यांनी अनेकदा शिवसेनेचा उल्लेख करून शिवसेना आणि कोकण यांचे नाते बाळासाहेब ठाकरे यांचे सिंधुदुर्गाचे असलेले नाते बाळासाहेबांना खोटे बोललेले आवडत नव्हते त्यामुळेच खोटे बोलणार्यांना शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेतून हाकलून दिले, असेही त्यांनी नारायण राणे यांच्याकडे बघत सांगितले.

त्यापूर्वी नारायण राणे यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांना आपल्या भाषणातून चिमटे काढून घेतले. सिंधुदुर्ग ही आपली जन्म आणि कर्मभूमी आहे अनेक नेते मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना चुकीचे ब्रीफिंग करतात. त्यातून गैरसमज पसरतात, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अन्य शिवसेना नेत्यांचा समाचार घेतला.

ठाकरे आणि राणे या दोन्ही नेत्यांनी एरवी एकमेकांवर तोफा ङागताना जी भाषा वापरतात तशी भाषा या कार्यक्रमात वापरली नाही. परंतु एकमेकांना चिमटे काढणे देखील सोडले नाही. आदित्य ठाकरे यांच्या विषयी बोलताना, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. कारण ती बाळासाहेबांनंतरची तिसरी पिढी आहे त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असणारे काम त्यांनी करून दाखवावे अशा अशा शब्दात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या.

In the inauguration of Chippewa Airport, Thackeray and Rane called each other “Alliance of Development”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात