Cruise Drugs Case : राष्ट्रवादीच्या आरोपांवर NCBची पत्रकार परिषद, नियमानुसार आमची कारवाई, तपासानंतरच आरोपींना अटक!

Cruise drugs case NCB Reply On NCP Nawab Malik Allegations our action as per rules, arrest of accused after investigation

Cruise drugs case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीने केलेले सर्व आरोप निराधार आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे. एनसीबीने म्हटले की, 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर छापे टाकण्यात आले. कारवाई नियमानुसार होती आणि सर्व आरोपींना चौकशीनंतरच अटक करण्यात आली. Cruise drugs case NCB Reply On NCP Nawab Malik Allegations our action as per rules, arrest of accused after investigation


प्रतिनिधी

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीने केलेले सर्व आरोप निराधार आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे. एनसीबीने म्हटले की, 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर छापे टाकण्यात आले. कारवाई नियमानुसार होती आणि सर्व आरोपींना चौकशीनंतरच अटक करण्यात आली.

NCBचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटले की, नियमानुसार NCB साक्षीदारांसह क्रूझवर पोहोचली होती. आतापर्यंत 9 स्वतंत्र साक्षीदार या खटल्यात सामील झाले आहेत. 2 ऑक्टोबरच्या छाप्यापूर्वी एनसीबीची त्यांच्याशी ओळख नव्हती.

राष्ट्रवादीने केले आरोप

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. तेव्हापासून या प्रकरणाला राजकारण वळण लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले. एवढेच नाही तर मलिक यांनी एनसीबीच्या छाप्याला बनावट म्हटले आणि या प्रकरणात भाजपशी संबंधित लोकांना सोडण्यात आल्याचा आरोप केला.

इतरांना का सोडण्यात आले?

राष्ट्रवादीने काही लोकांना सोडल्याच्या आरोपाला उत्तर देताना एनसीबीने सांगितले की, चौकशी केल्यानंतर 6 जणांना सोडून देण्यात आले. तर 8 जणांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते. नंतर चौकशी आणि खुलाशांच्या आधारे आणखी 10 लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे.

2 ऑक्टोबर रोजी 8 जणांना अटक

एनसीबीने सांगितले, एजन्सी व्यावसायिक दृष्टिकोनाचा अवलंब करते. आम्ही सार्वजनिक स्त्रोत आणि गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करतो. 2 ऑक्टोबर रोजी गुप्त सूचनेच्या आधारावर आम्ही आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर छापा टाकला आणि 8 जणांना पकडले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि 1 लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त केली.

NCB च्या कारवाईदरम्यान स्वतंत्र सार्वजनिक साक्षीदार आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत आमच्याकडे साक्षीदारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी वेळ नाही. या प्रकरणात 9 स्वतंत्र साक्षीदार आहेत. आम्ही त्यांना आधी ओळखत नव्हतो. एवढेच नाही तर एनसीबीने म्हटले आहे की, ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाईट वागणूक देण्यात आलेली नाही.

आम्ही जाती-धर्माच्या आधारावर कारवाई करत नाही

यापूर्वी एनसीबीने मनीष भानुशाली आणि केपी गोसावी यांच्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. एजन्सीने या प्रकरणात त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, आम्ही सर्व कामकाजात स्वतंत्र साक्षीदार वापरतो. मनीष भानुशाली आणि केपी गोसावी दोघेही सारखेच होते. आम्ही जात आणि धर्माच्या आधारावर कारवाई करत नाही, असेही ते म्हणाले. आमचे काम पुरावे आणि न्यायालयाच्या देखरेखीवर केंद्रित आहे. सिंह पुढे म्हणाले, “या प्रकरणात उच्चस्तरीय व्यक्तींचा सहभाग असल्याने, माहितीची गळती टाळण्यासाठी आणि कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी, आम्ही त्यांना एनसीबी कार्यालयात आणले, त्यांना गर्दी आणि अनेक कॅमेऱ्यांपासून वाचवले. शिवाय, ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीशी गैरवर्तन झाले नाही.

Cruise drugs case NCB Reply On NCP Nawab Malik Allegations our action as per rules, arrest of accused after investigation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण