बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे खोटे बोलणाऱ्यांना थारा नव्हता, तुम्हीही गुप्तचर लावून लोकप्रतिनिधी काय करताहेत माहिती घ्या, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे खोटे बोलणाऱ्याना थारा नव्हता.आपणही गुप्तचर लावून आपले लोकप्रतिनिधी काय करतात याची माहिती घ्यावी असा सल्ला केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला. Balasaheb Thakare never supported liars, find out what the your people’s representatives are doing by spying, Narayan Rane advises Uddhav Thakare


विशेष प्रतिनिधी

कणकवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे खोटे बोलणाऱ्याना थारा नव्हता.आपणही गुप्तचर लावून आपले लोकप्रतिनिधी काय करतात याची माहिती घ्यावी असा सल्ला केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला.

चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी राणे बोलत होते. विमानतळाला विरोध कसा झाला हे सांगताना राणे म्हणाले, विमानतळाचे काम सुरू झाले तेंव्हा काही जण आंदोलन करत होते. रेड्डी बंदराला ही विरोध करतात. हायवेचे कामही अडवण्यात आले. त्यामागे कोण आहेत, कोण आडवत होते त्याची माहिती घ्या. सी वीड तोंडवलीला कोण आंदोलन करत होतं. हा प्रकल्प कोणी अडवला याचीही माहिती घ्या.

राणे म्हणाले, चिपी विमानतळ सुरू होत आहे हा जीवनातला आनंदाचा क्षण आहे. यावेळी राजकारण करू नये असं वाटत होते. मात्र विमानतळ काम सुरू झाले तेंव्हा काही जण आंदोलन करत होते. त्याचे फोटोही आहेत. राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी १९९० साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवले. ९० साली निवडून आलो.तेव्हा जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, वीज नव्हती, शाळा नव्हत्या नोकरीसाठी लोक मुंबई गाठायचे. मुंबईवर अवलंबून असलेल्या हा जिल्हा होता. बाळसाहेबांमुळे मी या जिल्ह्याचा विकास करू शकलो. मुख्यमंत्री झाल्यानंतर १२० कोटी सिंधुदूर्गला दिले. पाण्यासाठी ११८ कोटी दिले.आत्ताचं इन्फ्रास्चक्चर आहे ते नारायण राणे मुळे आहे. त्याच्या जवळपास पण कोणी नाही. शिक्षणात आग्रेसर जिल्हा झाला. तो कोणामुळे ते सर्वांना माहित आहे.

Balasaheb Thakare never supported liars, find out what the your people’s representatives are doing by spying, Narayan Rane advises Uddhav Thakare

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती