WATCH : ‘उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला’, वाचा… चिपी विमानतळ उद्घाटनावेळी नारायण राणेंचं भाषण


कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे मुख्मयंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्र्यांनी उपस्थिती लावली. याशिवाय केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑनलाइन हजेरी लावली. यावेळी नारायण राणेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसमोर सिंधुदुर्गाच्या कामाचं श्रेय आपलंच असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केलाय. Sindhudurg Chipi Airport inaguration CM Thackeray Union Minister Narayan Rane Full Speech


विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे मुख्मयंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्र्यांनी उपस्थिती लावली. याशिवाय केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑनलाइन हजेरी लावली. यावेळी नारायण राणेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसमोर सिंधुदुर्गाच्या कामाचं श्रेय आपलंच असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केलाय.

नारायण राणे यांचं भाषण…

भाषणाची सुरुवात करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्गाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असे उल्लेख करत त्यांनी मंचावरील आदित्य ठाकरेंसह सर्वच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि रिपाइंच्या नेत्यांची नावे घेतली. माझ्या आयुष्यातील हा एक अतिशय चांगला क्षण असल्याचं ते म्हणाले. अशा ठिकाणी राजकारण करू नये असं वाटत होतं. जावं, शुभेच्छा द्याव्या आणि सिंधुदुर्गातून विमान उडताना डोळेभरून पाहावं असं वाटलं. त्यासाठी आलो. मंचावर आल्यावर मुख्यमंत्री भेटले. ते माझ्या कानावर काही तरी बोलले. मी एक शब्द ऐकला. असो, असं राणे म्हणाले.

मी या जिल्ह्याचा विकास केला

नारायण राणे म्हणाले की, पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांनी यावं. पाच सहा लाख खर्च करावेत, त्यामुळे सिंधुदुर्गाच्या वासियांना रोजगार मिळावा. म्हणून विमानतळ व्हावं हा हेतू होता. 90साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो. तिथे प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते. गावाचे रस्ते सोडा, हायवेही बरोबर नव्हते. शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही ही अवस्था होती. अनेक गावात वीजही नव्हती. इथली मुलं शिकली. मुंबई-पुण्यात नोकरीला यायचे. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.



मी नाव घेतलं तर राजकारण होईल…

राण पुढे म्हणाले की, उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध? मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आज हायवे. अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा. सीवर्डसाठी अजित पवारांनी 100 कोटी दिलं. काय झालं हो. कोणी सीवर्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय.”

तुम्ही आलात हे बरं वाटलं…

यावेळी राणे म्हणाले की, तुम्ही आलात हे बरं वाटलं. आनंद वाटलं. सन्माननीय आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी अभ्यास करावा. त्यांनी टाटाचा रिपोर्ट वाचावा. आदित्य माझ्यासाठी टॅक्स फ्रि आहेत. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? काय प्रोटोकल काय? मानसन्मान घ्या. प्रोटोकॉल जरुर पाळा. तुम्हाला सर्व माहिती मिळते, ब्रीफ होतेय. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात. बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांना थारा नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असंही ते म्हणाले.

Sindhudurg Chipi Airport inaguration CM Thackeray Union Minister Narayan Rane Full Speech

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात