मेंदूचा शोध व बोध : प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास मेंदूला मिळते चालना


हायटेक युगात अशा सतराशे साठ गोष्टींशी गाठ पडते. ज्या चमत्कारच वाटाव्यात. हे इंजिनीअरांनाच कळणार, असे म्हणून आपण सोडून देतो. खरं तर ते फारसे कठीण नाही. त्यातले गणित आणि सूक्ष्म तपशील जरी किचकट असले तरी मुख्य आयडियाची कल्पना काय आहे, हे कोणालाही कळू शकते. कोणतेही उपकरण कितीही हायटेक असले तरी त्यात साधी साधी तत्त्वेच एकत्र गुंफलेली असतात.Trying to find answers to questions stimulates the brain

मुख्य तत्त्व एखादेच असते. तेवढे कळले तरी त्या उपकरणाविषयी रहस्याची भावना उरत नाही आणि ते हाताळताना भीती वाटत नाही. कोणीही आपल्या तोंडावर चार इंग्लिश संज्ञा फेकून आपल्याला गप्प करू शकत नाही. एवढी सर्व प्रगती का शक्य झाली हे समजल्याने आपला माणसाविषयीचा आदर वाढतो.

साधी जिज्ञासादेखील एक स्वमूल्य असलेली गोष्ट आहे. कुतूहल प्रत्येक प्राणिमात्राला असतेच. पण जेव्हा जिज्ञासा उत्पन्न होते, तेव्हा माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा होतो. उलगडा होईपर्यंत अस्वस्थ राहणारी मनेच आजच्या समस्यांना भिडण्याचे धाडस करू शकतात. एखादी गोष्ट कळून काय उपयोग? असा प्रश्न विचारण्याऐवजी ती जेव्हा कळते तेव्हा त्या कळण्याच्या प्रक्रियेत जो आनंद असतो, तो आनंद घेण्याची चव चाखून पाहिलीच पाहिजे. उदाहरणार्थ व्हॉल्व्ह वा झडप म्हणजे काय? अगदी मिठागराचा खड्डा हीसुद्धा झडपच आहे.

भरतीचे पाणी त्यात अडकते. प्रवाह एका दिशेने जाईल, पण उलट दिशेने अडवला जाईल, असे केले की प्राथमिक झडप होते. आणखी एक उदाहरण म्हणजे इंधन आणि स्फोटके यांत फरक काय? जेव्हा इंधनासोबत अंगचा ऑक्सिजन असतो, पण तो इंधनाला भेटू दिला जात नसतो, असे मिश्रण म्हणजे स्फोटके! अशी उदाहरणे बघत बघत आपण अनेक तंत्रांचे मर्म जाणून घेऊ शकतो.

थोडक्यात काय तर मेंदूला जिज्ञासा आवडत असते. आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत नाही. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास मेंदूला चालना मिळते. मेंदूला प्रश्न आवडतात त्यामुळे पडलेले प्रश्न तसेच सोडून देवू नका शक्य तितके उत्तरे शोधून कुतूहल पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ही मेंदूची मशागत आहे.

Trying to find answers to questions stimulates the brain

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती