मनी मॅटर्स: अशक्य परताव्याची अपेक्षा ठेवू नका

सध्या कोरोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थीती बेताची होण्यास सुरुवात झालेला आहे. अशा वेळी हातातील पैसे जपून वापरणे फार आवश्यक आहेच. पण गुंतवणूक करतानाही फार नीट काळजी घेण्याची सक्त गरज आहे. अर्थात कोणतीच परिस्थीती कायम रहात नसते. त्यामुळे आज जी बाजारात स्थीती आहे तीच उद्याही कायम राहील अशी स्थीती नाही. त्यामुळे सांतपणे विचार करून गुंतवणक केल्यास नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.Donot expect impossible returns

जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुतंवले असतील तर कधीही अशक्य परताव्याची अपेक्षा ठेवू नका. शेअर बाजारात तेजी-मंदीची चक्रे येतात. त्यामुळे बाजार पडला तर लगेच घाबरून जावू नका. अशा वेळी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी विचारविनिमय करून योग्य ते निर्णय घ्या. त्याचप्रमाणे कोणत्याही काळात वास्तविक परताव्याची अपेक्षा ठेवा. ठराविक नफा मिळाला की त्यातून बाहेर पडा.

शेअर बाजारात अतिलोभ अनेकदा नुकसानीस कारणीभूत ठरतो. कोणताही शेअर कधी विकत घ्यायचा याचे जसे गणित असते तसेच बाजारातून बाहेर कधी पडायचे याचेही एक गणित असते. त्यानुरूप निर्णय घ्या. कधीही अनावश्यक कर्ज घेऊ नका. पण कधी घेण्याची वेळ आली तर ते कर्ज लवकर फेडून टाका.

नेहमी पैसे वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवा. यासाठी आपण गुंतवणुकीचाही तोल सावरायला हवा. म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड्स, पोस्ट, सोने अशा निरनिराळ्या साधनांमध्ये पैसे गुंतवा. एकाच ठिकाणी पैसे गुंतवल्यास त्यात धोका जास्त असतो. जे लवकर बचतीला सुरुवात करतात त्यांना पुढे आयुष्यात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यताही कमीच असते. त्यामुळे तरुणपणीच गुंतवणुकीला सुरुवात करा. त्याचा लाभ जीवनभर झाल्याशिवाय रहात नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पुरेसे विमा संरक्षण घ्या.

मला काय होणार, पुढे बघू असा विचार करू नका. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींप्रमाणे पुरेसे विमा संरक्षण घ्या. गरजेप्रमाणे आर्थिक नियोजन बदला. लग्न न झालेल्या मुलाच्या आर्थिक गरजा व एक मूल असलेल्या माणसाच्या आर्थिक गरजा नक्कीच वेगळ्या असतील. आपले वय काय आहे, आपल्यावर कोणती जबाबदारी आहे त्यानुसार गुंतवणूकीचे निर्णय घ्या.

Donot expect impossible returns