दुर्गा सन्मान : सर्वांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलविणाऱ्या डॉक्टर उज्वला दहिफळे!


औरंगाबाद – जगात सर्व चेहऱ्यांवर सुंदर हास्य फुलावे हेच आपले जीवनध्येय मानून काम करणाऱ्या डॉ. उज्वला दहिफळे यांची शैक्षणिक आणि वैद्यकीय कारकीर्द त्यांच्या नावा इतकीच उज्ज्वल राहिली आहे!! त्यांनी औरंगाबादच्या एमजीएम मेडिकल क़ॉलेजमधून एमबीबीएस, सरकारी महाविद्यालयातून एमएस अर्थात मास्टर इन सर्जरी तर मुंबईच्या सुप्रसिध्द ग्रँट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी प्लास्टिक सर्जरी या विषयात एम सीएच पदव्या मिळविल्या. Doctor Ujwala Dahiphale with beautiful smile

Navratri 2021 Navdurga Mahatmya Devi Chandraghanta worshiped on third Day Of Navratri, Know Historical Story

 

ड़ॉ. उज्ज्वला दहिफळे यांना मराठवाडा आणि विदर्भ विभागतल्या पहिल्या महिला प्लास्टिक लेजर सर्जन होण्याचा सन्मान प्राप्त आहे. अशा कर्तृत्वशालिनी व्यक्तिमत्त्वाला पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार देताना “द फोकस इंडिया”ला धन्यता वाटत आहे.

त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्लास्टिक सर्जरी या विषयाच्या असिस्टंट प्रोफेसर आहेत. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिस प्लास्टिक सर्जन याच्या संस्थेच्या त्या ऑर्गनायझेशन सेक्रेटरी आहेत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे स्माईल इंडिया संस्थेच्या त्या प्रकल्प संचालिका आहेत. ६ हजार पेक्षा जास्त ओठ आणि टाळूच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत.

 

केवळ भारतातच नाही तर जगाभरात जाऊन त्यांनी केलेले टाळू शस्त्रक्रियांचे त्यांचे काम मोठे आहे. अमेरिका, म्यानमार या देशांमध्ये त्यांनी टीम लीडर म्हणून काम केले आहे. इतकेच नाही तर देशात कोलकता, गुवाहाटी, जमशेदपूर, मुंबई आणि औरंगाबाद या केंद्रांमध्ये देखील त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.

१९९५ पासून मराठवाड्य़ाच्या विविध भागांमध्ये आणि शहरांमध्ये डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी प्लास्टिक सर्जरी शिबिरे भरवून जनजागृती केली आहे. मराठवाड्यातील ज्येष्ठ नेत्या विमलताई मुंदडा यांच्या जन्मदिनानिमित्त ताई महोत्सवात त्यांनी अनेक वर्षे ग्रामीण भागात प्लास्टिक सर्जरीची शिबिरे भरवून यशस्वी केली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डॉ. उज्ज्वला दहिफळे यांना एम. एस. जनरल सर्जरी या विषयासाठी सन 2000 मध्ये चिटगोपेकर आणि दरक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याच वर्षी त्यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्कार देखील मिळाला आहे. २०१६ मध्ये अमेरिकेतील व्हर्जिनियात त्यांना Behind The Smiles, Doctors Tackle Hard Task of Care for Poor USA या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या खेरीज देशाअंतर्गत अनेक परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध वाचले आहेत. यामध्ये राजधानी दिल्लीतील ANTI-AGING AESTHETIC & COSMETIC MEDICINE/SURGERY, प्रदर्शन – परिषदेत आणि मुंबईत भरलेल्या आशियायी देशांच्या प्लास्टिक सर्जरी परिषदेतही डॉ. उज्ज्वला दहिफळे या सहभागी झाल्या आहेत.

 

 

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी बेटी बचाव बेटी पढाव आंदोलनाच्या त्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रदेश सहअध्यक्षा आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वैद्यकीय पत्रिकांमध्ये त्यांचे संशोधन विषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध पदांवर त्या कार्यरत आहेत. एस्थेटिक प्लास्टिक सर्जरी आणि सामाजिक कार्य ही त्यांची विशेष आवड राहिली आहे.

या खेरीज डॉ. उज्ज्वला दहिफळे यांचा दुर्मिळ गुण आणि पैलू म्हणजे त्या उत्तम अभिनेत्री आहेत. महाविद्यालयीन जीवनात एकपात्री प्रयोगात त्यांनी प्रथम पुरस्कार मिळविला आहेच, या शिवाय १९८५ मध्ये शालेय जीवनात त्यांनी कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच १९९४ मध्ये औरंगाबादचे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

Doctor Ujwala Dahiphale With Beautiful Smile

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात