PM Modi : संवेदनशील पंतप्रधान! जनरल हुडांच्या बहिणीचे ट्विट लगेच पीएम मोदींचा कॉल- मदतीचे आश्वासन-हुडा म्हणाले Thank you


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांचे सैन्य दलातील जवान, अधिकारी आणि त्यांच्या नातलगांविषयीच्या संवेदना समोर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्या बहिणीला मोठे आश्वासन दिले आहे.Narendra Modi who expressed concern over the case. Truly humbled and honoured on receiving his call

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्या बहिणीला कर्करोग (कॅन्सर) झाला आहे. उपचारासाठी त्यांना अमेरिकेत मिळणाऱ्या विशिष्ट औषधांची आवश्यकता आहे. या औषधांना भारतात अद्याप परवानगी दिलेली नाही. यामुळे विशेष परिस्थती म्हणून संबंधित औषधे मागवण्याची आणि त्यांचे सेवन करण्याची परवानगी द्यावी; अशा स्वरुपाची विनंती करणारे ट्वीट लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्या बहिणीने केले.

ट्वीट करताना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्या बहिणीने पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे कार्यालय, लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालनालय आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांना टॅग केले होते. हे ट्वीट लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग करुन रीट्वीट केले. यानंतर थोड्याच वेळात पंतप्रधान कार्यालयाने संपर्क केला.

पंतप्रधान कार्यालयाने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांची बहीण सुषमा हुडा यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच सुषमा हुडा यांना हव्या असलेल्या औषधाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. आपल्या विनंतीचा तातडीने विचार होईल; असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने पंतप्रधान कार्यालयाने दिले. कोण आहेत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा

दहशतवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यानंतर भारताने उरी येथील दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केला होता. या सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी केले होते.

Narendra Modi who expressed concern over the case. Truly humbled and honoured on receiving his call

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात