ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापनदिनी उद्या १ ऑगस्टला मुस्लिम महिला अधिकार दिन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ट्रिपल तलाक विरोधी कायद्याच्या वर्धापन दिनी उद्या १ ऑगस्ट रोजी मुस्लिम महिला अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हे जाहीर केले Muslim Women Rights Day will be observed across the country tomorrow 1st August 2021

१ ऑगस्ट 2019 रोजी ट्रिपल तलाक विरोधी कायदा अस्तित्वात आला. याला उद्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने केंद्र सरकारने “मुस्लिम महिला अधिकार दिवस” साजरा करण्याचे ठरविले आहे.

ट्रिपल तलाक विरोधी कायदा मंजूर झाल्यानंतर तीन तलाक प्रकरणांमध्ये भरपूर कमी आली आहे. मुस्लिम महिलांना त्यांच्या घटनात्मक मूलभूत अधिकारांची जाणीव झाली आहे. केंद्र सरकार मुस्लीम महिलांच्या कल्याणासाठी तसेच त्यांनी आत्मनिर्भर बनावे यासाठी विविध योजना राबवते आहे. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागला आहे, असे मुक्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या वतीने होणाऱ्या उद्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांच्या बरोबरच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि स्मृती इराणी हे दोन नेते देखील सहभागी होणार आहेत.

Muslim Women Rights Day will be observed across the country tomorrow 1st August 2021

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात