खासदार परनीत कौर काँग्रेसमध्ये राहूनच कॅप्टन साहेबांची साथ देणार!!


वृत्तसंस्था

चंडीगड : काँग्रेस नेतृत्व जसे आपल्याशी डबल गेम खेळले आहे, तसेच प्रत्युत्तर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या परिवाराने काँग्रेस नेतृत्वस द्यायचे ठरवले आहे कॅप्टन साहेब यांच्या पत्नी खासदार परनीत कौर या काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत, पण त्याच वेळी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना त्या साथ देणार आहेत. MP Parneet Kaur will stay in Congress and support Captain Saheb !!

त्यांच्याच वक्तव्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. कॅप्टन साहेबांनी जरी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी मी काँग्रेसची खासदार आहे. मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. कॅप्टन साहेब स्वतःचा निर्णय घ्यायला समर्थ आहेत, अशा शब्दात परनीत कौर यांनी त्याचे संवर्धन केले आहे.

त्या म्हणाल्या, की सध्या काँग्रेस मध्ये जे सुरू आहे त्याबद्दल पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत आणि ते स्वाभाविकही आहे. पक्षाच्या नेतृत्वाने आणि यामध्ये लक्ष घातले पाहिजे. काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी कॅप्टन साहेबांचा अपमान केला ही बाब अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना खटकली आहे असे घडायला नको होते, असे परणीत कौर यांनी म्हटले आहे.

परनीत कौर यांची फक्त कॅप्टन साहेबांच्या पत्नी म्हणून ओळख नाही, तर त्या काँग्रेसच्या खासदार आहेत. 2009 ते 2014 या काळात परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्री होत्या. कॅप्टन अमरिंदरसिंग यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द त्यांनी जवळून पाहिली आहे.



त्या म्हणाल्या की, ज्यावेळेला एकापाठोपाठ एक राज्य काँग्रेस हरत होती, त्या वेळी कॅप्टन साहेबांनी मोठ्या मेहनतीने पंजाब मध्ये काँग्रेसचा प्रचार करून अकाली दलाची १० वर्षांची सत्ता संपवली. काँग्रेसला सत्तेवर आणले. त्या कॅप्टन साहेबांचा काँग्रेसच्या नेत्यांकडून अपमान व्हायला नको होता, याचा पुनरुच्चारही परणीत कौर यांनी केला आहे.

याचा अर्थच कॅप्टन साहेब जसे काँग्रेस बाहेर राहून काँग्रेसच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत, त्याचप्रमाणे परनीत कौर या काँग्रेस मध्ये राहूनच काँग्रेसच्या नेतृत्वावर विविध प्रकारे आणि विविध वेळी तोफा डागण्यासाठी काम करणार आहेत. यातून बाकी कोणाचा फायदा होवो न होवो काँग्रेसचे नुकसान होणार आहे आणि नेमके हेच कॅप्टन साहेबांचे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत टार्गेट आहे.

MP Parneet Kaur will stay in Congress and support Captain Saheb !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात