कोरोना असतानाही भारतीय लष्कराने सीमेवरील आव्हान परतवून लावले, जनरल मनोज नरवणे यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाचे आव्हान असतानाही भारतीय लष्कराने तातडीने हालचाली केल्या. त्यामुळे लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आव्हान परतवून लावणे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी गुरुवारी सांगितले.Despite Corona, Indian Army repulses border challenge, says General Manoj Narwane

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वार्षिक सत्रात जनरल नरवणे बोलत होते. ते म्हणाले, लडाखच्या सीमेवर आव्हान निर्माण झाल्यावर तातडीने सैन्याची जमवाजमव करणे आवश्यक होते. त्यावेळी देशात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर होती. मात्र, तरीही भारतीय लष्कराने हे आव्हान स्वीकारले.नरवणे म्हणाले, पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घडामोडींनी पश्चिम आणि पूर्वेकडील आघाडीवरील आव्हानांमध्ये भर घातली होती. संसाधनांची जमवाजमव, सैन्याची व्यवस्था आणि तत्काळ प्रतिसाद, हे सर्व कोविड -19 बाधित वातावरणात आवश्यक होते. मात्र, लष्कराला हे करणे शक्य झाले कारण आरोग्याच्या संकटावर मात करण्यासाठी लष्कर पूर्ण सज्ज होते.

याचे कारण म्हणजे अंतभार्गात चालू असलेल्या प्रॉक्सी वॉरमुळे, भारतीय लष्कर वर्षभर सक्रिय असते. आपल्या देशाची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करते.कोरोना महामारीच्या काळात लष्कराच्या कामगिरीची माहिती देताना नरवणे म्हणाले, हवाई दलाने चीन, इराण आणि कुवैत सारख्या देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण ऑपरेशन केले आणि हजारो टन वैद्यकीय साहित्य आणले. विविध देशांत अडकलेल्या हजारो भारतीयांना बाहेर काढताना नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतू सुरू केले.

जलद प्रतिसाद वैद्यकीय पथके अनेक देशांमध्ये तैनात करण्यात आली. ऑपरेशन नमस्ते अंतर्गत लष्कराने देशभरात मोठ्या संख्येने रुग्णालयांची स्थापना केली. लष्करी रुग्णालये सर्वांसाठी खुली करण्यात आली आणि सशस्त्र दलाच्या चाचणी प्रयोगशाळांमध्ये चोवीस तास काम सुरू होते. लष्कराने मानेसर, मुंबई, चेन्नई, भोपाळ, हैदराबाद आणि इतर शहरांमध्ये क्वारंटाईन सुविधाही उभारल्या.

नरवणे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑस्ट्रेलिया, जर्मनी, यूके, यूएई आणि इस्त्राईल सारख्या देशांमधून हवाई आणि नौदलाने ऑक्सिजन सिलिंडर, जनरेटर आणि कन्सेंट्रेटर्स, क्रायोजेनिक कंटेनर यासारख्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला. लष्करी स्पेशल ट्रेनचा वापर हॉटस्पॉटवर वैद्यकीय संसाधने पाठवण्यासाठी केला गेला. सैन्यातील तंत्रज्ञांनी सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमधील अकार्यक्षम आॅक्सिजन प्लांटची दुरुस्ती केली.

संकट हेच संधी समजून लष्कराने केलेल्या कार्याची माहिती देताना जनरल नरवणे म्हणाले, कोरोना साथीमुळे जगात अनेक बदल घडले. खंडित पुरवठा साखळी, अवाजवी किंमत वाढ आणि काही लोभी राष्ट्रांकडून संधी साधून संसाधन पुरवठा नाकारण्यात आला. त्यामुळे आत्मनिर्भरतेच्या धोरणाला बळकटी मिळाली.

काही देश अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून देशाला रोखत असल्याचा धोका ओळखून आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न केले गेले. व्यवसाय सुलभेच्या दृष्टीने बदल घडवून आणले. देशांतर्गत उद्योगाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, लष्कराने अलिकडच्या काही महिन्यांत भारतीय कंपन्यांना 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे करार केले आहेत.

त्याच वेळी, विकास आणि समृद्धीचा सुरक्षेशी जवळचा संबंध आहे आणि गुंतवणूकीसाठी सुरक्षित वातावरण तयार केले आहे. जवळजवळ 9,000 कोटी रुपयांचे दारूगोळा, शस्त्रास्त्र, वाहने, सुटे आणि विशेष पर्वतारोहण उपकरणे खरेदी करण्यासाठी 113 करार झाले. 6,500 कोटी किमतीच्या भांडवली खरेदीसाठी आणखी 68 करार करण्यात आले. सेवा मुख्यालयातील आपत्कालीन अधिकार समितीच्या परिश्रम आणि आर्थिक विवेकबुद्धीमुळे सुमारे 1,700 कोटींची बचत झाली.

Despite Corona, Indian Army repulses border challenge, says General Manoj Narwane

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी