भंगारातून रेल्वेने केली २२७.७१ कोटी रुपयांची कमाई


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर रेल्वेने तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी भंगारच्या विक्रमी विक्रीतून 227.71 कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या कालावधीत 92.49 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. भंगार विक्रीच्या बाबतीत उत्तर रेल्वे आता सर्व भारतीय रेल्वे आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये वर आली आहे, असे उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक आशुतोष गांगल सांगितले आहे.Railways earned Rs 227.71 crore from scrap

स्क्रॅप कमाईसह कामाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करतो. भंगाराची विल्हेवाट लावणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. रेल्वे ट्रॅकचे तुकडे, स्लीपर, रेल्वे लाईनजवळील टायबार सारख्या स्क्रॅपमुळे सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, पाण्याच्या टाक्या, केबिन, आणि इतर बंद संरचनांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.



मोठ्या संख्येने गोळा केलेल्या स्क्रॅप पीएससी स्लीपरची उत्तर रेल्वेकडून विल्हेवाट लावली जात आहे जेणेकरून रेल्वेची जमीन इतर कामांसाठी आणि महसूल उत्पन्नासाठी वापरता येईल. शून्य स्क्रॅप दर्जा प्राप्त करण्यासाठी उत्तर रेल्वे मिशन मोडमध्ये स्क्रॅपची विल्हेवाट लावण्यास तयार आहे. त्यांचे त्वरित विल्हेवाट लावण्यासाठी उच्च स्तरावर निरीक्षण केले जात असून, याला प्राधान्य देण्यात आले आहे, असे गांगल यांनी सांगितले.

Railways earned Rs 227.71 crore from scrap

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”