Remdesivir Import Duty Free : सरकारने रेमडेसिव्हिरची इम्पोर्ट ड्यूटी हटवली, आणखी स्वस्त होणार इंजेक्शन, पुरवठाही वाढणार

Modi Govt Big Dicision Now Remdesivir Import Duty Free Prices Will Drop more, Supply Also Increased

Remdesivir Import Duty Free : कोरोना महामारीच्या संकटाला देश सामोरे जात आहे. यामुळे उपचारांत जीवनरक्षक ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे चिंता वाढली होती. परंतु केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करत या इंजेक्शनच्या उत्पादन वाढीबरोबरच याच्या किमतीत मोठी कपात नुकतीच केली आहे. एवढेच नाही, आता मोदी सरकारने या जीवनरक्षक इंजेक्शनवरील आयात शुल्क हटवल्याने रेमडेसिव्हिर आणखीन स्वस्त होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने घोषणा केली की, रेमडेसिव्हिर एपीआय, रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि बीटा सायक्लोडेक्सट्रिन (रेमडेसिव्हिर निर्मितीसाठी याचा वापर होतो) यांच्यावरील आयात शुल्क पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. Modi Govt Big Dicision Now Remdesivir Import Duty Free, Prices Will Drop more, Supply Also Increased


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटाला देश सामोरे जात आहे. यामुळे उपचारांत जीवनरक्षक ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे चिंता वाढली होती. परंतु केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करत या इंजेक्शनच्या उत्पादन वाढीबरोबरच याच्या किमतीत मोठी कपात नुकतीच केली आहे. एवढेच नाही, आता मोदी सरकारने या जीवनरक्षक इंजेक्शनवरील आयात शुल्क हटवल्याने रेमडेसिव्हिर आणखीन स्वस्त होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने घोषणा केली की, रेमडेसिव्हिर एपीआय, रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि बीटा सायक्लोडेक्सट्रिन (रेमडेसिव्हिर निर्मितीसाठी याचा वापर होतो) यांच्यावरील आयात शुल्क पूर्णपणे हटवण्यात आले आहेत.

पीयूष गोयल यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली. पीयूष गोयल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठाही वाढेल आणि सोबतच याच्या उत्पादन खर्चातही घट होईल. अशा प्रकारे सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना बाधित रुग्णांना मोठी मदत होईल.

रेमडेसिव्हिरच्या किमती

  • कॅडिला हेल्थकेयर लिमिटेडने REMDAC इंजेक्शनचे दर 2800 रुपयांवरून घटवून 899 रुपये केले आहे.
  • सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेडने RemWin इंजेक्शनचे दर 3950 रुपयांहून घटवून 2450 रुपये केले आहे.
  • डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज लिमिटेडने REDYX इंजेक्शनचे दर 5400 रुपयांहून घटवून 2700 रुपये केले आहे.
  • सिप्लाने CIPREMI इंजेक्शनचे दर 4000 रुपयांऐवजी आता 3000 रुपये केले आहेत.
  • मायलॅन फार्मास्युटिकल्सने DESREM इंजेक्शनचे दर 4800 रुपयांवरून घटवून 3400 रुपये केले आहे.
  • जुबिलेंट जेनरिक लिमिटेडने JUBI-R इंजेक्शनचा दर 4700 रुपयांहून घटवून 3400 रुपये केला आहे.
  • हेटेरो हेल्थकेयर लिमिटेडने COVIFOR इंजेक्शनचा दर 5400 रुपयांहून घटवून 3490 रुपये केला आहे.

दुप्पट होणार रेमडेसिव्हिरचे उत्पादन

काही दिवसांपासून अनेक राज्यांत रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याचा मुद्दा समोर आला होता. यामुळे आता सरकारने इंजेक्शनचा तुटवडा आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिरची उत्पादन क्षमता दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत 38.8 लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन दर महिन्यात तयार होत होते. आता हेच प्रमाण 78 लाखांपर्यंत वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

Modi Govt Big Dicision Now Remdesivir Import Duty Free Prices Will Drop more, Supply Also Increased

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात