भारत – चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील 500 गावांचे मोदी सरकार करणार पुनर्वसन!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत – चीन सीमेलगतच्या ओस पडलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील(LAC) जवळपास 500 गावांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यासाठीचा प्लॅन देखील मोदी सरकारने तयार केला आहे.Modi government will rehabilitate 500 villages on India-China Line of Direct Control!!

 2500 कोटींचे बजेट

भारत – चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जवळपास 500 गावे ओस पडली होती. या सर्व गावांतील लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता राहणारे लोक फार कमी आहेत. त्यामुळे या गावांचा पुनर्विकास करण्यासाठी मोदी सरकारने कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी 2500 कोटींचे बजेटही निश्चित केल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.



मुलभूत गरजांची पूर्तता करणार

सीमावर्ती भागांत ओस पडलेल्या या 500 गावांना सेकंड लाईन ऑफ डिफेन्सच्या दृष्टीकोनातून तयार करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. तसेच पुनर्वसन केल्यानंतर या गावातील लोकांना आरोग्य, शिक्षण यांसारख्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्यासाठी येथे राहणा-या नागरिकांना आश्वासन देण्यात येत असून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी संपर्क करण्यात येत आहे.

असा आहे प्लॅन

या भागांत घरे बनवण्यासोबतच पर्यटनाच्या सुविधाही वाढवण्यावर सरकार भर देणार आहे. जेणेकरुन इथे राहणा-या नागरिकांना उपजीविकेसाठी साधन मिळेल. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी देखील केंद्र सरकार या भागांत नोक-या उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. किमान एक प्राथमिक शाळा, शाळेच्याच आवारात शिक्षकांना वास्तव्यासाठी निवासस्थाने तयार करण्यात येणार आहेत.

Modi government will rehabilitate 500 villages on India-China Line of Direct Control!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात