बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्यातुरुंगवासासंबंधीचा कायदा रद्द, पूर्वलक्षी प्रभावाने जप्तीची कारवाई नाही


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बेनामी व्यवहार कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल देताना बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा, १९८८चे कलम ३(२) असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. यासोबत बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा रद्द करण्यात आला आहे. मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.Repeal of law on 3 years imprisonment for benami property, no confiscation with retrospective effect

काय आहे कायद्यात?

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जुन्या प्रकरणांमध्ये २०१६च्या कायद्यानुसार कारवाई होणार नाही. बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्याच्या कलम ३(२) मध्ये असे म्हटले होते की, आरोपीला दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतील.बेनामी मालमत्ता म्हणजे काय?

बेनामी मालमत्ता ही अशी मालमत्ता आहे, ज्याची किंमत दुसऱ्याने भरलेली आहे, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे. ही मालमत्ता पत्नी, मुले किंवा नातेवाइकांच्या नावावरही खरेदी केलेली असू शकते. ज्या व्यक्तीच्या नावावर अशी मालमत्ता खरेदी केली जाते त्याला ‘बेनामदार’ म्हणतात.

Repeal of law on 3 years imprisonment for benami property, no confiscation with retrospective effect

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात