तैवान विरुद्ध आक्रमक झालेल्या चीनला भारताने मात्र खडसावले; लडाख पासून विमाने ठेवा दूर!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेन काँग्रेसच्या प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी यांच्या तैवान भेटीनंतर आक्रमक झालेल्या चीनला भारताने मात्र लडाख या विषयावर खडसावले आहे. लडाख पासून तुमची विमाने दूर ठेवा, अशा कडक शब्दात भारतीय प्रतिनिधींनी चिनी प्रतिनिधींना सुनावले आहे. However, India reprimanded China for aggressively attacking Taiwan

भारत आणि चीनच्या सीमेवरील तणाव कायम असताना आता भारताने चीनला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. पूर्व लडाखच्या सीमेजवळ लढाऊ विमानांचे उड्डाण केल्याबद्दल भारताने चीनला थेट इशारा दिला आहे.

नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने तैवानच्या हद्दीत 100 लढाऊ विमाने उडविली. काही क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी एक जपानच्या हद्दीत पडले. चीनने एकूण तैवानवर दादागिरी करून घेतली.

या पार्श्वभूमीवर त्याच्या आधीपासून चीनची लढाऊ विमाने पूर्व लडाखच्या सीमेजवळ आगळीक करताना दिसत आहेत. त्यामुळे चीनकडून दगाफटका होऊ नये म्हणून भारताने चीनला लडाखच्या सीमेपासून लढाऊ विमानं दूर ठेवायला सांगितले आहे. चीनने तैवानची सर्व बाजूंनी कोंडी केली आहे तशी चीन भारताची कोंडी करू शकणार नाही. भारत ऐकून घेणार नाही. तोडीस तोड प्रत्युत्तर देईल, असाच इशारा भारतीय प्रतिनिधींनी चिनी प्रतिनिधींना दिला आहे.

लडाख सीमेवर चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यां समवेत झालेल्या बैठकीत भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. विमानांचा सराव चीनने आपल्या हद्दीत करावा तसेच LAC आणि 10 किमी. सीबीए रेषेचे पालन करावे असेही भारतीय अधिका-यांनी चीनला बजावले आहे.

भारतही तयार

सीमेवर चीनच्या कारवायांवर भारताची करडी नजर आहे. भारतीय सैन्याने पूर्व लडाखच्या सीमेवर विशेष रडार तैनात केली आहेत. जर चीनकडून काही दगाफटका करण्याचा प्रयत्न झालाच तर भारतही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल, असे भारतीय सैन्य दलानेही स्पष्ट केले आहे.

However, India reprimanded China for aggressively attacking Taiwan

महत्वाच्या बातम्या