जुन्याच वॉर्ड रचनेनुसार निवडणूक; महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये फूट पाडायला कारणीभूत!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षांचा समावेश असला तरी ठाकरे पवार सरकारने घेतलेला निर्णय आता या घटक पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसमुळेच शिंदे – फडणवीस सरकारने बदलला. परिणामी महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट तर पडलीच आहे पण काँग्रेसमध्येही उभी फूट पडायला हा निर्णय कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.Election according to old ward structure; Caused a split in the Congress with the Mahavikas Aghadi!!

भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष

असताना मुंबईचे अध्यक्ष माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे देवरा यांच्या गटाची मागणी विचारात घेऊन शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेत तत्कालिन महाविकास आघाडी सरकारलाच धक्का दिल्याचे बोलले जात आहे.



काँग्रेसमध्येही उभी फूट

दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत पक्षापासून अलिप्त राहण्यास सुरुवात केली. पण तेव्हापासून सक्रीय नसलेले मिलिंद देवरा यांनी मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून २३६ प्रभार रचना आणि त्यांचे सीमांकन तसेच आरक्षण सोडतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. मिलिंद देवरा यांच्यासह आमदार अमिन पटेल, झिशान सिद्दीकी, माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह आरक्षणात प्रभागच गेलेले माजी नगरसेवक आदींच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यापूर्वीच्या ठाकरे पवार सरकारने घेतलेल्या २३६ प्रभागांचा निर्णय बदलून जुन्याच पध्दतीने २२७ प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी असला तरी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना आणि त्यानंतरच्या प्रभाग आरक्षणाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि तत्कालिन विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जाहीर पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली होती तसेच न्यायालयातही दाद मागितली होती.

परंतु दुसऱ्या आरक्षणानंतर तर काँग्रेसच्या नगरसेवकांना याचा फटका बसल्याने अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षांऐवजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या काही नगरसेवकांसह आमदारांचे नेतृत्व करत त्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु हे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष बसून होते. भाई जगताप यांनी या सरकारला भेटण्याची इच्छा न दाखवल्याने मिलिंद देवरा यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये देवरा गट पुन्हा एकदा सक्रीय होताना दिसत असून काँग्रेसमध्ये उभी फूट पडतेय की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Election according to old ward structure; Caused a split in the Congress with the Mahavikas Aghadi!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात