हिट अ‍ॅँड रन प्रकारात आठ पट नुकसान भरपाई मिळणार, पादचारी अपघातग्रस्तांसाठी मोदी सरकारचा निर्णय


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अपघातांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर हिट अ‍ॅँड रन प्रकारात मृत्यूमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ होणार आहे. पादचारी अपघाग्रस्तांना आता आठ पट भरपाई देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.Modi government decides for pedestrian accident victims to get eight times compensation in hit and run mode

देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच आहे. यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून पादचाऱ्याला धडक देऊन पळून जाण्याचे प्रकारही सातत्याने वाढत आहे. मात्र, अपघातातील मृत्यू पडणाऱ्या पादचाऱ्यांचे कुटुंबीय किंवा गंभीर जखमींना पुरेशी आर्थिक मदत मिळत नाही.या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडणाऱ्या रहिवाशांच्या कुटुंबियांना 8 पटीने अधिक भरपाई दिली जाणार आहे. अर्थात या भरपाईची रक्कम आता 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. अपघातातील गंभीर जखमी झालेल्यांना 12,500 ऐवजी 50 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे.केंद्र सरकारच्या नव्या योजनेचे नाव हिट अँड रन मोटर अपघातातील बळींची भरपाई योजना, 2022 असे असणार असून ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे.

मंत्रालयाकडून 25 फेब्रुवारी 2022 रोजी ह्यहिट अँड रनह्ण रस्ते अपघातातील पीडितांना भरपाई देण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. गंभीर जखमींसाठी भरपाईची रक्कम वाढवून 50,000 रुपये करण्यात आली आहे, तर मृत्यूच्या बाबतीत सध्याच्या 25,000 रुपयांवरून 2,00,000 लाख रुपये अशी भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे.

1 एप्रिल 2022 पासून ही नवी योजना जुन्या भरपाई योजना, 1989 ची जागा घेईल. नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यासाठी व पीडितांना पैसे देण्यासाठीही मुदत निश्चित करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रालयाने मोटार वाहन अपघात कायदा निधीशी संबंधित नियमही निश्चित केले आहेत.

या निधीतून हिट अँड रन अपघातातील जखमींना उपचारासाठी तसेच इतर मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातांची सखोल चौकशी करण्याची प्रक्रिया असणार आहे. अपघातांचा तपशीलवार अहवाल आणि दाव्यांचा जलद निपटारा यासाठीही तरतूद आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीमध्ये हिट अँड रन अपघातांमध्ये 536 लोकांचा मृत्यू झाला तर 1655 लोक गंभीर जखमी झाले. सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 3,66,138 रस्ते अपघात झाले. त्यात 1,31,714 लोकांचा मृत्यू झाला.

Modi government decides for pedestrian accident victims to get eight times compensation in hit and run mode

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती