भारतीय सैन्याला सर्व ऋतूंमध्ये मनालीशी लेहद्वारे संपर्क ठेवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने लडाखमधील शिंकून ला खिंडीत ४.२५ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यास परवानगी दिली आहे. ५९०१ मीटर उंचीवर हा बोगदा बांधला जाणार आहे. Ministry of Defense gives permission to build 4.25 km long tunnel in Ladakh
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय सैन्याला सर्व ऋतूंमध्ये मनालीशी लेहद्वारे संपर्क ठेवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने लडाखमधील शिंकून ला खिंडीत ४.२५ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यास परवानगी दिली आहे. ५९०१ मीटर उंचीवर हा बोगदा बांधला जाणार आहे.
संरक्षण मंत्रालयांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने या भागाला जोडण्यासाठी नव्या रस्त्यासह १३.५ किलोमीटरचा बोगदा बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने ४.२५ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधावा असे सुचविले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
मार्च २०२१ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेनने आपले प्रेझेंटेशन संरक्षण मंत्र्यांसोमर सादर केले होते. दोन्हींचा अभ्यास केल्यावर संरक्षण मंत्रालयाने छोट्या लांबीच्या बोगद्याला मंजूरी दिली आहे. याबाबतचा निर्णय अद्याप अधिकृत कागदावर आलेला नाही. याचे कारण म्हणजे या प्रकल्पासंदर्भातील अनेक वरिष्ठ अधिकारी सध्या कोरोनाग्रस्त आहेत.
बॉर्डर सिक्युरिटी आर्गनायझेशनने सुचविलेल्या बोगद्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. याचे कारण म्हणजे त्यासाठीचे डिझाईन साधे सोपे आहे. या बोगद्यात व्हेंटिलेशनसाठी बनाना फॅन्स वापरले जाणार आहेत. त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च कमी असून इलेक्ट्रिसिटीही कमी लागते.
डार्चा-पडूम-निमू हा २९७ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. बॉर्डर सिक्युरिटी ऑर्गनायझेशनने यातील १०० किलोमीटर रस्त्याचे दुहेरीकरण केले आहे. गेल्या वर्षी भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण असताना या रस्त्याची उभारणी करण्यात आली. या रस्त्यामुळे मनाली ते लेह दरम्यानचे अंतर पूर्वीइतकेच राहणार असले तरी संपूर्ण रस्ता बर्फवृष्टीतही चालू राहणार आहे. त्यामुळे लष्कर या रस्त्याचा वापर वर्षभर करू शकणार आहे. लडाख, कारगिल आणि सियाचीन भागात त्यामुळे आवश्यक मदत पोहोचविणे शक्य आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App