Manmohan Singh Letter To PM Modi : कोरोनाला कसे हरवायचे? मनमोहन सिंगांनी पीएम मोदींना पत्र लिहून दिल्या 5 सूचना, वाचा सविस्तर…

Manmohan Singh Letter To PM Modi on How To Defeat Corona, gave 5 suggestions

Manmohan Singh Letter To PM Modi : संपूर्ण देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान माजी पीएम मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मनमोहन सिंग यांनी पत्राद्वारे लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनामुळे होत असलेल्या विध्वंसचा संदर्भ देताना माजी पंतप्रधानांनी लसीकरणासंदर्भात 5 सूचना दिल्या आहेत. यात ते असेही म्हणाले आहेत की, 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचेही लसीकरण केले जावे. Manmohan Singh Letter To PM Modi on How To Defeat Corona, gave 5 suggestions


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान माजी पीएम मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मनमोहन सिंग यांनी पत्राद्वारे लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनामुळे होत असलेल्या विध्वंसचा संदर्भ देताना माजी पंतप्रधानांनी लसीकरणासंदर्भात 5 सूचना दिल्या आहेत. यात ते असेही म्हणाले आहेत की, 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचेही लसीकरण केले जावे.

1) आकडा पाहू नका, टक्केवारी पाहा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, किती लोकांना लसी दिली गेली आहे, याचा हा आकडा न पाहता आपण किती टक्के लोकांचे लसीकरण केले, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

मनमोहनसिंग म्हणाले की, सर्वात आधी सरकारने पुढच्या सहा महिन्यांसाठी लसींचे दिलेल्या ऑर्डर, कशा प्रकार त्यांचे राज्यांत वितरण होईल याबाबत माहिती दिली पाहिजे. ते म्हणाले, “सरकारने हे सांगितले पाहिजे की, वेगवेगळ्या लस निर्मात्यांना किती ऑर्डर देण्यात आली आहे, ज्या त्यांनी पुढच्या सहा महिन्यांत देण्याचे आश्वासन दिले आहे. जर आपल्याला लक्ष्यित संख्येत लोकांचे लसीकरण करायचे असेल तर आपल्याला अॅडव्हान्समध्ये पर्याप्त ऑर्डर देणे गरजेचे आहे, जेणेकरून उत्पादक वेळेवर त्या पुरवू शकतील.”

 

 

2) लस वितरणाबाबत सुस्पष्टता आणा

दुसर्‍या सल्ल्यात मनमोहन म्हणाले, “सरकारने हेही समजावून सांगितले पाहिजे की, या संभाव्य लसींचे वितरण राज्यांना कोणत्या पारदर्शक सूत्रांच्या आधारे करण्यात येणार आहे.” आपत्कालीन परिस्थितीसाठी केंद्र सरकार दहा टक्के राखू शकते, परंतु उर्वरित राज्यांना स्पष्ट संकेत मिळाला पाहिजे जेणेकरून त्यानुसार लसीकरणाची रूपरेखा आखता येईल.”

3) राज्यांना फ्रंटलाइन वर्कर्सची व्याख्या ठरवू द्या, 45 पेक्षाही कमी वयाच्या व्यक्तींना लस द्या

तिसर्‍या सल्ल्यात मनमोहन म्हणाले की, राज्यांना फ्रंटलाइन वर्कर्सची कॅटेगरी ठरवण्याची सूट दिली जावी, जेणेकरून त्यांना 45 वर्षांपेक्षाही कमी वयाचे असल्यास लस देता येऊ शकेल. उदा. राज्यांतील शाळेतील शिक्षक, बस, थ्री व्हीलर आणि टॅक्सी ड्रायव्हर्स, मनपा आणि पंचायत कर्मचारी आणि वकिलांना लस दिली पाहिजे. 45 वर्षांपेक्षा कमी वय असूनही त्यांना लस दिली जाऊ शकते.

4) लस उत्पादक कंपन्यांना फंड व सवलत द्या

माजी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही दशकांत भारत सर्वात मोठा लस उत्पादक म्हणून उदयास आला आहे. ते पुढे म्हणाले, बहुतांश क्षमता खासगी क्षेत्रातील आहे. सध्याच्या सार्वजनिक आरोग्यासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत भारत सरकारने लस उत्पादकांना मदत केली पाहिजे, जेणेकरून उत्पादन क्षमता वेगाने वाढू शकेल. यासाठी त्यांनी कंपन्यांना फंड व सवलत देण्याचा सल्ला दिला.

5) इतर देशांनी मान्यता दिलेल्या लस ट्रायलविना मंजूर करा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, लसीचा देशांतर्गत पुरवठा करणारे मर्यादित आहेत, म्हणून युरोपियन मेडिकल एजन्सी किंवा यूएसएफडीएने मंजूर केलेल्या कोणत्याही लसींना देशात आयात करण्यासाठी मान्यता देण्यात यावी. ते म्हणाले की, देशात चाचणी न करता त्यांना मंजुरी दिली पाहिजे. आणीबाणीच्या परिस्थितीत ही सूट न्यायोचित ठरेल.

Manmohan Singh Letter To PM Modi on How To Defeat Corona, gave 5 suggestions

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात