राहुल गांधींनी सभा रद्द करण्याचे कारण कोरोना की आणखी काही? वाढत्या कोरोना संकटासाठी एकच पक्ष जबाबदार कसा?

Know Why Rahul Gandhi Cancelled His Rallies, Who is responsible For Corona Crisis? Read Here

Rahul Gandhi Cancelled His Rallies : देशात कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण करायला सुरुवात केली आहे. मागच्या 24 तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1500 मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या गंभीर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी रविवारी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील आपल्या पुढच्या सभा रद्द करत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, एकतर प. बंगालची अर्धी निवडणूक झाल्यावर राहुल गांधी तेथे प्रचारासाठी आले. एका सभेनंतर आणि निवडणुकीचे आठपैकी केवळ तीन टप्पे शिल्लक असताना राहुल गांधींनी आपल्या सभा रद्द केल्या आहेत. Know Why Rahul Gandhi Cancelled His Rallies, Who is responsible For Corona Crisis? Read Here


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण करायला सुरुवात केली आहे. मागच्या 24 तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1500 मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या गंभीर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी रविवारी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील आपल्या पुढच्या सभा रद्द करत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, एकतर प. बंगालची अर्धी निवडणूक झाल्यावर राहुल गांधी तेथे प्रचारासाठी आले. एका सभेनंतर आणि निवडणुकीचे आठपैकी केवळ तीन टप्पे शिल्लक असताना राहुल गांधींनी आपल्या सभा रद्द केल्या आहेत.

आपल्या सभा रद्द करण्याबरोबरच राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी व इतर नेत्यांवर टीका केली आहे. आजारी व्यक्तींची एवढी मोठी गर्दी आणि विक्रमी संख्येने मृत्यू हे पहिल्यांदाच पाहतो आहे, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. राहुल गांधींनी यासोबत #rallies केले आहे. त्यांच्या इशारा पंतप्रधान मोदींच्या सभांना जमणाऱ्या गर्दीकडे आहे.

वास्तविक, शनिवारी पंतप्रधान मोदींनी आसनसोलमध्ये सभा घेतली होती. या सभेला प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. पंतप्रधानांनी या गर्दीचे कौतुक करत म्हटले की, मी दोन वेळा बंगालमध्ये आलो होतो. पहिल्यांदा बाबुलजी (बाबुल सुप्रियो) यांच्यासाठी मते मागण्यासाठी. पण पहिल्या सभेत एक चतुर्थांशही लोकं नव्हते, आज अशी सभा पहिल्यांदाच पाहिली. ते म्हणाले की, आज तुम्ही अशी ताकद दाखवली आहे की, दूरदूरपर्यंत फक्त लोकंच लोकं दिसत आहेत, काय कमाल केलीय तुम्ही लोकांनी!” पंतप्रधान मोदींच्या याच वक्तव्यावर टीका करताना राहुल गांधींनी कोरोना रुग्ण आणि मृत्यूंचे उदाहरण दिले.

सभा इकडच्या आणि तिकडच्या

राहुल गांधी ज्या गर्दीवरून पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत, तशीच गर्दी त्यांच्या सभेलाही होती. तीन दिवसांपूर्वीच गोलपोखर येथे झालेल्या त्यांच्या सभेतील दृश्ये पाहा. एवढेच नाही, त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांच्या आसाममधील सभा पाहिल्यास त्यातही गर्दीच होती.

दुसरीकडे, भाजपच्या बहुतांश सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा, मास्क घालून उपस्थित राहण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. यासंदर्भात भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओच ट्वीट केला आहे.

निवडणुका नसलेल्या राज्यांत कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक

कोरोना महामारीचे कारण देऊन राहुल गांधींनी स्वत:च्या नियोजित सभा (नेमक्या किती तेही स्पष्ट नाही) रद्द केल्या आणि इतर नेत्यांनाही असेच करण्याचे आवाहन केले. त्यांचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु दुसरीकडे अशीही चर्चा होत आहे की, बंगाल निवडणुकीत काँग्रेस मुळात शर्यतीतच नाही. डाव्यांसोबत आघाडी करूनही हाती काहीही लागणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानेच राहुल गांधींनी हा निर्णय घेतला आहे.

आता निवडणुका आणि कोरोनाचा संबंध लावणे कसे चुकीचे आहे हे पाहा. महाराष्ट्रात सध्या कोणतीही निवडणूक सुरू नाही, यामुळे सभा, मेळावे, रोड शो असले प्रकार नाहीत. तरीही येथे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आहेत. शेजारच्या गुजरात, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतही रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तेथे कोणत्या निवडणुका सुरू आहेत? प्रचंड गर्दीच्या सभा नाहीत तरीही या राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय हे सत्य आहे.

खरे तर कोरोना ही एक जागतिक महामारी आहे. आता तर कोरोना हवेतूनही पसरतोय, असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलंय. कोरोना प्रसारासाठी कोणताही एक व्यक्ती किंवा राजकीय पक्षाला जबाबदार ठरवणं चुकीचं आहे. भारत सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. याबरोबरच लसीकरणही सुरू आहे. जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दोन – तीन लाटा येऊन गेल्या आहेत. भारतही अशाच एका लाटेचा सामना सध्या करत आहे. विषाणूतील म्युटेशनमुळे नवीन स्ट्रेन तयार होतो आणि या आजाराची तीव्रता आणखी वाढते, हे ढळढळीत सत्य आहे. लस घेतल्यावरही कोरोना होतो, फक्त तो गंभीर होत नाही. यामुळे ‘दो गज दुरी, मास्क है जरूरी’ हा मूलमंत्र सर्वांनी अंगी बाणवणे गरजेचे आहे.

Know Why Rahul Gandhi Cancelled His Rallies, Who is responsible For Corona Crisis? Read Here

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात